Corona Update | कोरोना काळातही लग्नाची धामधूम, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लग्न सभारंभात केवळ 50 व्यक्तींना परवानगी असताना या लग्नाला शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (Bhandara Marriage Social distancing)

Corona Update | कोरोना काळातही लग्नाची धामधूम, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
Marriage Social distancing
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 3:14 PM

भंडारा : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे एका लग्न सभारंभात घोडे नाचवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले आहे. पण नागरिकांनी या निर्बंधाचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. (Bhandara Marriage Social distancing)

भंडारा जिल्ह्यात एक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाहसोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. लग्न सभारंभात केवळ 50 व्यक्तींना परवानगी असताना या लग्नाला शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तसेच लग्न सभारंभात घोडे नाचवण्यावर बंदी आहे. तरीही या लग्न सभारंभात घोडे नाचवण्यात आले.

या कार्यक्रमात लग्न समारंभात सामाजिक अंतराचे कोणतेही पालन करण्यात आले नाही. भंडारा शहरात दिवसेंदिवस  कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच जर नागरिक ऐकत नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहे.

दरम्यान भंडारा जिल्ह्यात लग्न सभारंभात जे घोडे नाचवण्यात आले त्यांना ग्लेंडर या प्राणघातक रोगाची लागण झाली आहे. या आजारावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्लैंडर्सने पीड़ित असलेल्या या दोन्ही घोड्यांना दयामरण देण्यात आले आहे. या दोन्ही घोड्यांना खड्डा खणून त्यात पुरण्यात आले.

नागपुरात लग्नाच्या वरातीत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

तर दुसरीकडे नागपुरच्या महाल परिसरात लग्नाची वरात मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. या वरातीतल शेकडो वऱ्हाडी उपस्थित होते. यातील अनेकांनी मास्कही घातला नव्हता. या लग्नाच्या वरातीत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. यातील अनेक लोक नाचण्यात दंग होते.

नागपुरात लॉकडाऊन असताना लग्नाची वरात काढण्यात आली. लग्न समारंभला मोठ्या स्वरुपात बंदी असली तरी महाल  परिसरात एक लग्नाची वरात रविवारी निघाली. एकीकडे गेल्या तीन दिवसांपासून नागपूरात 2 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. तरीही अनेकांना कोरोनाची भीती राहिली नाही.

महाराष्ट्रात 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात एकूण 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 547 इतकी झाली आहे. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हजार 671 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यानुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल. तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील, त्यासाठी राज्य सरकारनं मुभा दिलीय. पण त्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहेत. मास्क नसल्यास ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तापमान यंत्राने तपासणी केली असता तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास त्यालाही प्रवेश मिळणार नाही. (Bhandara Marriage Social distancing)

संबंधित बातम्या : 

भंडाऱ्यात पाणीपुरी आणि न्यूडल्स खाल्यानं 30 ते 40 जणांना विषबाधा, एका मुलीचा मृत्यू

VIDEO | ना लग्न झालं, ना साखरपुडा, तरीही ‘गेली माझी बायको गेली’ का म्हणतायत पोरं, एकदम कडक!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.