Bhandara: बनावट शिक्क्यांचा वापर करून रेतीची तस्करी, दोघांवर गुन्हा दाखल

Bhandara: बनावट शिक्क्यांचा वापर करून रेतीची तस्करी, दोघांवर गुन्हा दाखल
बनावट शिक्क्यांचा वापर करून रेतीची तस्करी
Image Credit source: tv9 marathi

तुमसर तहसील कार्यालयाच्या पथकाने गत आठवड्यात चार ब्रास रेती असलेला टिप्पर अवैध वाहतूक करताना जप्त केला होता. त्या टिप्परची माहिती परिवहन विभागाकडून घेतली. त्यावेळी गाडीला चुकीचा क्रमाक लिहिल्याचे आढळून आले आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 15, 2022 | 9:33 AM

भंडारा – भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या तुमसर (Tumasar) तालुक्यात बनावट शिक्क्यांचा वापर करून रेतीची तस्करी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसर पोलिसांनी (Tumasar Police) गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे. टिप्पर मालक दुर्योधन पटले, चालक स्वप्निल या दोघांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गाडीचा नंबर देखील चुकीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तस्करी करणाऱ्या गाडीचा नंबर सुध्दा चुकीचा

तुमसर तहसील कार्यालयाच्या पथकाने गत आठवड्यात चार ब्रास रेती असलेला टिप्पर अवैध वाहतूक करताना जप्त केला होता. त्या टिप्परची माहिती परिवहन विभागाकडून घेतली. त्यावेळी गाडीला चुकीचा क्रमाक लिहिल्याचे आढळून आले आहे. तसेच वनविभागाचा तपासणी नाका पार करण्यासाठी लागणाऱ्या पत्रावरही बनावट शिक्का असल्याचे आढळून आला आहे. हा शिक्का या तस्करांनी तयार केल्याचे पुढे आले आहे. चुकीचा टिप्पर क्रमांक व बनावट शिक्का आढळून आल्याने तलाठी देवानंद भीमराव रामटेके यांनी तुमसर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून टिप्पर मालक दुर्योधन पटले व चालक स्वप्निल यांच्या विरुद्ध तुमसर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यावरून पोलिसांनी भादंवि 379, 420, 471,468 सह गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस कसून चौकशी करीत आहेत

रेतीची तस्करी करण्यासाठी अजून किती जणांनी बनावट शिक्क्यांचा वापर केला आहे. यांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची सुध्दा चौकशी करण्यात य़ेणार आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें