Omicron Variant Update | अबुधाबीहून दोघे प्रवासी विदर्भात, दर दोन तासांनी वॉच, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर टेन्शन

परदेशातून भंडारा जिल्ह्यात आलेल्या दोघा प्रवाशांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथून दोघे जण मोहाडी-तुमसर येथे आले आहेत.

Omicron Variant Update | अबुधाबीहून दोघे प्रवासी विदर्भात, दर दोन तासांनी वॉच, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर टेन्शन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

तेजस मोहतुरे, भंडारा : ओमिक्रॉनमुळे (Omicron) देशभरात सध्या दहशतीचं वातावरण पसरलं आहे. परदेशातून आलेल्या दोन प्रवाशांनी भंडारा जिल्हा प्रशासनाचं टेन्शन वाढवलं आहे. कारण अबुधाबीहून मोहाडी-तुमसर येथे दोघे जण परतले आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवले आहे. दोघांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचं अद्याप वृत्त नाही.

अबुधाबीहून दोघे जण मोहाडी-तुमसर

परदेशातून भंडारा जिल्ह्यात आलेल्या दोघा प्रवाशांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथून दोघे जण मोहाडी-तुमसर येथे आले आहेत. सध्या दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रोन या नवीन कोरोना वेरिएंटची दहशत सर्वत्र पाहायला मिळात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत. राज्य सरकारही याबाबत खबरदारी बाळगत असून सर्व जिल्हा प्रशासन आता खडबडून जागे झाले आहेत.

दोघेही होम क्वारंटाईन

भंडारा जिल्हा प्रशासनाने संबंधित व्यक्तींना होम क्वारंटाईन केले असून दर दोन तासांनी त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे. याशिवाय सात दिवसांनी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे या दोघा प्रवाशांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असल्याचं दिसत आहे.

भंडाऱ्यात कोरोना स्थिती काय

भंडारा जिल्ह्यात सद्धा एक सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण असून जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजार 106 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 58 हजार 972 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 1133 रुग्णांचे बळी गेले आहेत. त्यामुळे मागील दोन लाटांच्या तडाखा बघता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी परदेशातून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या ओमिक्रॉन अहवालाची वाट बघितली जात आहे. ह्या सर्व घडामोडींमुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाची धाकधूक वाढली आहे.

कोणत्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष?

आफ्रिका आणि यूरोपियन देशात ओमिक्रॉननं हात पाय पसरायला सुरुवात केलीय. त्यात धोकादायक देशांच्या लिस्टमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बोत्सवाना, चीन, मॉरीशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकॉंग आणि इस्त्रायल ह्या देशांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

धाकधूक वाढली! ‘हाय रिस्क’ देशातून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनच्या चाचणी अहवालाची प्रतिक्षा

काय सांगता? आता च्युइंगम खाल्ल्यानं कोरोना पळणार? नवा शोध, ‘ओमिक्रॉन’वर नवी आशा

Published On - 8:45 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI