सामान्य माणसं आणि बुद्धिवादी लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी, हे पाहून अंगी बारा हत्तीचं बळ आलंय : राजू शेट्टी

नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला कोल्हापुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सामान्य माणसं आणि बुद्धिवादी लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी, हे पाहून अंगी बारा हत्तीचं बळ आलंय : राजू शेट्टी
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 4:00 PM

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला कोल्हापुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे कृषी विधेयकांची होळी करत विधेयके तातडीने रद्द करण्याची मागणी केली. (With the backing of the common man and Rationalist, the power has increased even more: Raju Shetty)

कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही शांततेच्या मार्गाने बंद ठेवला, आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नाही. सामान्य माणसं, बुद्धिवादी लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, हे पाहून उर भरून आला आहे. हे पाहताना अंगात बारा हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय. आता हे आंदोलन अधिक तीर्व होईल.

राजे शेट्टी म्हणाले की, “सरकारने शेतकरी आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामान्य माणूस खवळला आहे. सरकारने प्रतिष्ठा पणाला लावू नये, या देशात शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही”.

“कृषी कायद्याच्या समर्थनात आंदोलनं सुरु आहेत. परंतु तिथली केविलवाणी परिस्थिती आम्ही पाहतोय, त्याची दखल घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने आता शेतकऱ्याला गृहीत धरु नये. तसे केल्या आंदोलन अधिक तीव्र होईल”, असे राजू शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्यास 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार : भुजबळ

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी पेटून उठले आहेत. आज याचा उद्रेक होत भारत बंदंची हाक देण्यात आली. पण शेतकऱ्यांचं हे आंदोलन राजकीय आंदोलन नाही. सर्व मार्केट कमिटींनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ म्हणाले की, कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम असा आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळत आहे. त्याला शंभर टक्के केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंद करण्यात आला. याला राज्यातून अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. केंद्राच्या आडमुठेपणामुळे आघाडी सरकारने भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे दिवस संपले : वड्डेटीवार

‘आम्ही येतो आणि आम्ही येणार असं म्हणणार्‍यांचे दिवस संपले आहेत. आता परत कधी येणार नाही असं त्यांनी म्हणावं अशा शब्दात विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे पूर्ण बहुमत आहे, यांना आता संधी नाही असंही वड्डेटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

BHARAT BAND | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत! दिल्लीतील आजची स्थिती काय?

BHARAT BAND | संप यशस्वी झाला, फेल झाला की संमिश्र राहीला?

(With the backing of the common man and Rationalist, the power has increased even more: Raju Shetty)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.