Bhaskar Jadhav : चव ना लव पण पाहूण्या पोटभर जेव, भास्कर जाधवांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली

Bhaskar Jadhav : चव ना लव पण पाहूण्या पोटभर जेव, भास्कर जाधवांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली
चव ना लव पण पाहूण्या पोटभर जेव, भास्कर जाधवांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली
Image Credit source: tv9

नारायण राणे यांचे कोकण आणि महाराष्ट्राने नाव विरसलंय. त्यामुळे माझी आठवण ठेवण्यासाठी नारायण राणे यांची धडपड सुरु असल्याचं सांगत भास्कर जाधवांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा समाचार घेतलाय.

मनोज लेले

| Edited By: दादासाहेब कारंडे

May 18, 2022 | 4:21 PM

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हुंकार सभेनंतर दोन्ही बाजुने जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि त्यावर नारायण राणे (Narayan Rane) यांची प्रतिक्रिय येणार नाही असे होणारच नाही. साहाजिकच राणेंनी पत्रकार परिषदेत गेत शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लााबोल चढवला. मुख्यमंत्र्यांवर प्रहार करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शिवसेनेही आता चोख उत्तर दिलंय. शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar jadhav) केंद्रीय मंत्री नाराय़ण राणेंवर पलटवार केलाय. नारायण राणे म्हणजे कोकणी भाषेत सांगायचं झालं तर चव ना लव पण पाहूण्या पोटभर जेव, नारायण राणे यांचे कोकण आणि महाराष्ट्राने नाव विरसलंय. त्यामुळे माझी आठवण ठेवण्यासाठी नारायण राणे यांची धडपड सुरु असल्याचं सांगत भास्कर जाधवांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा समाचार घेतलाय.

पाहा भास्कर जाधव काय म्हणाले?

फडणवीसांच्या सभेवर जोरदार हल्लाबोल

तर अयोद्धा दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भास्कर जाधवांनी खिल्ली उडवलीय. करून करून भागला आणि देवपुजेला लागला असं सांगत राज ठाकरेंचा नावाचा उल्लख टाळत भास्कर जाधवांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. शिवसेनेच्या मेळाव्यानंतर उत्तर सभा घेणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भास्कर जाधवांनी हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि फडणवीस यांची दुखती नस दाबली त्यातून मिळणारी कळ आणि वळवळ म्हणजे दवेंद्र फडणवीस यांची हि सभा होती, देवेंद्र फडवीस यांची उत्तर सभा नव्हती. तर पूर्व नियोजीत उत्तर भारतीयांचा मेळावा होता, अशी टाका भास्कर जाधवांनी केली आहेत.

हे सुद्धा वाचा

मराठी माणसांचा, नेत्यांचा अपमान करणारी सभा

तसेच हिंदी भाषिकांसमोर मराठी भाषिकांचा आणि नेत्यांचा अवमान करणारी फडणवीस यांची ती सभा होती, देवेंद्र फडणवीस यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट त्यांनी वाचली असा घणाघात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. मुख्यमंत्र्यांची सभा झाली की त्याच्या दुसऱ्याच दिवशी सभा घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विविध मुद्द्यांवरून जोरदार पलटवार केला. त्यांनी अयोध्याची बाबरी पाडण्यापासून ती हिंदुत्वाच्या मुद्द्यांपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं दिलं, तसेच मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या वजनावरून खिल्ली उडवली होती. मात्र त्यांनी त्यालाही जोरदार प्रत्युत्तर देत, वजनदार माणसाच्या पायावर नाक रगडून तुम्ही सत्तेत बसला आहेत, असा पलटावर केला. त्यावरून आता शिवसेना नेते पलटवार करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें