युतीतही बंडाळी, भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढणार

अहमदनगर:  औरंगाबादेत काँग्रेसमध्ये पहिली बंडखोरी झाली असताना, आता युतीतही बंडखोरी सुरु झाली आहे.  शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी म्हटलं. शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची नाराजी असल्याने, मला ही निवडणूक लढवायची आहे, अशी …

युतीतही बंडाळी, भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढणार

अहमदनगर:  औरंगाबादेत काँग्रेसमध्ये पहिली बंडखोरी झाली असताना, आता युतीतही बंडखोरी सुरु झाली आहे.  शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी म्हटलं. शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची नाराजी असल्याने, मला ही निवडणूक लढवायची आहे, अशी भूमिका वाकचौरे यांनी घेतली आहे.

भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार असून, सध्या भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्तपदही ते भूषवत आहेत. यावेळी शिवसेनेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. पण शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलं. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. वाकचौरे यांच्या बंडखोरीमुळे शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

कोण आहेत भाऊसाहेब वाकचौरे?

भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सध्या ते भाजपमध्ये आहेत.

वाकचौरे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर 2014 ची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी पराभव झाला.

सध्या त्यांच्याकडे साईबाबा संस्थानचे विश्वस्तपद

शिवसेना,काँग्रेस ,भाजपा आणि आता अपक्ष असा वाकचौरे यांचा राजकीय प्रवास आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *