अमित शाहांची सोलापुरातील सभा उधळून लावू, भीम आर्मीचा इशारा

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Solapur) यांची सोलापुरातील सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने (Bhim Army) दिला आहे.

अमित शाहांची सोलापुरातील सभा उधळून लावू, भीम आर्मीचा इशारा

सोलापूर : गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Solapur rally) यांची सोलापुरातील सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने (Bhim Army) दिला आहे. महाराष्ट्रात दलित सुरक्षित नाहीत, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजानादेश यात्रा घेत फिरत आहेत, असा आरोप भीम आर्मीचा (Bhim Army) आहे. त्यामुळए उद्या होणारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Solapur rally) यांची जाहीर सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला.

दोन महिन्यापूर्वी मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या जालन्याच्या तरुणीवर सामूहिक  बलत्कार झाला. पीडितेवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री हे गृहखाते सांभाळण्यास सक्षम नसल्याचा आरोप करत उद्या होणारी जाहीर सभा उधळण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे.

अमित शाहांच्या उपस्थितीत मेगाभरती

दरम्यान, अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह अनेक नेते उद्या प्रवेश करण्याची चिन्हं आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याहून निघालेल्या भाजपच्या महाजानदेश यात्रेचा समारोप सोलापुरात पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एक तारखेला सोलापुरातल्या पार्क स्टेडियम येथे हा यात्रेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख,यांच्यासह डझनभर मंत्र्याची उपस्थितीत जाहीरसभेनंतर यात्रेचा समारोप होईल.

संबंधित बातम्या 

या 10 दिग्गजांचा अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित? 

वरळीतून विधानसभा लढवून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार, अनिल परब यांनी ‘ठरवलंय’   

नातेवाईक सोडून का चालले? प्रश्न विचारताच शरद पवार संतापले, माफीची मागणी 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *