LIVE : भीमा कोरेगावात शौर्यदिनाचा उत्साह

लाईव्ह अपडेट : विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी, सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीला समता दलाचे जवान हजारोंच्या संख्येत अनुयायी जमण्यास सुरुवात, अत्यंत शिस्तबद्धपणे, शांतपणे आणि रांगेत विजयस्तंभाला अभिवादन सुरु विजयस्तंभाला अभिवादनासाठी दिवसभरात सुमारे 3 ते 4 लाख लोक येण्याची शक्यता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून सकाळी 7 वाजता विजयस्तंभाला अभिवादन ………………….. भीमा कोरेगाव : भीमा कोरेगाव …

LIVE : भीमा कोरेगावात शौर्यदिनाचा उत्साह

लाईव्ह अपडेट :

  • विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी, सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीला समता दलाचे जवान

  • हजारोंच्या संख्येत अनुयायी जमण्यास सुरुवात, अत्यंत शिस्तबद्धपणे, शांतपणे आणि रांगेत विजयस्तंभाला अभिवादन सुरु
  • विजयस्तंभाला अभिवादनासाठी दिवसभरात सुमारे 3 ते 4 लाख लोक येण्याची शक्यता
  • भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून सकाळी 7 वाजता विजयस्तंभाला अभिवादन

…………………..

भीमा कोरेगाव : भीमा कोरेगाव येथील भीमा नदीकाठावरील ऐतिहासिक विजयस्तंभांला मानवंदना सोहळ्यासाठी फुलमाळ्यांनी सजावट करुन रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी या परिसरात मोठ्या संख्येने भीमसागर लोटला होता. नव्या वर्षाची सुरुवात कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देऊन साजरी केली जाते. त्यानिमित्ताने विजयस्तंभाला काल दिवसभर फुलमाळ्यांनी सजावट सुरु होती. रात्रीच्या पर्यंत ही सजावट पूर्ण करुन 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

PHOTO : भीमा कोरेगावात शौर्यदिनाचा उत्साह, विजयस्तंभावर आकर्षक सजावट

रात्रीपासून देशभरातून येणाऱ्या भाविकांनी शौर्यदिवस साजरा करत विजयस्तंभाला मानवंदना देऊन दर्शनासाठी गर्दी केली आहे. गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने या परिसरात भविकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे

भीमा कोरेगावचा इतिहास काय आहे?

भीमा कोरेगावजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या 30 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *