VIDEO : वसईत भाजप कार्यकर्त्यांची दादागिरी, पोलिसांना धक्काबुक्की

वसई : सोमवारी रात्री वसईमधील वालीव परिसरात भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवर दादागिरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडीओमध्ये भाजप कार्यकर्ते पोलिसांवर दादगिरी करुन शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. वालीव पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विरेन्द्र कुमार याचाही समावेश आहे. काल रात्री …

VIDEO : वसईत भाजप कार्यकर्त्यांची दादागिरी, पोलिसांना धक्काबुक्की

वसई : सोमवारी रात्री वसईमधील वालीव परिसरात भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवर दादागिरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडीओमध्ये भाजप कार्यकर्ते पोलिसांवर दादगिरी करुन शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. वालीव पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विरेन्द्र कुमार याचाही समावेश आहे.

काल रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी वालीव पोलिसांसोबत धक्काबुक्की आणि शिवागाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वसई युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विरेन्द्र कुमार यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना वालीव पोलीस ठाण्याबाहेर घडली आहे. पोलिसांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचेही या व्हिडीओतून समोर आले आहे. या सातही कार्यकर्त्यांची रवानगी थेट तरुंगात करण्यात आली आहे.

या घटनेनंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र हा व्हिडिओ समोर आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची दादागिरी  समोर आली आहे.

आतापर्यंत पोलिसांवर अनेक हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहे. यावर कडक कारवाई करावी असे आदेशही सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते जर पोलिसांवर हल्ला करत असतील तर पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *