सुप्रियाताई, तुमच्या आमदाराला समज द्या, सुनिता शिंदेंच्या पत्रानं खळबळ

अहमदनगर : श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच, एका पत्राने मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांची तक्रार करणारे पत्र सुनिता शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना धाडलं आहे. सुनिता शिंदे या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार आहेत. सुनिता शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठवलेल्या पत्रामुळे सध्या श्रीगोंद्यात मोठी …

सुप्रियाताई, तुमच्या आमदाराला समज द्या, सुनिता शिंदेंच्या पत्रानं खळबळ

अहमदनगर : श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच, एका पत्राने मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांची तक्रार करणारे पत्र सुनिता शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना धाडलं आहे. सुनिता शिंदे या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार आहेत. सुनिता शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठवलेल्या पत्रामुळे सध्या श्रीगोंद्यात मोठी खळबळ उडाली असून, सध्या याच पत्राची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी केली. या टीकेवरुन श्रीगोंद्यातून वादाला सुरुवात झाली आहे. आता हा वाद खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचलो आहे.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने मला उमेदवारी दिली आहे. तर प्रचारात आमदार राहुल जगताप यांनी वरील विधान करुन महिलावर्गाचा अपमान केल्याची भावना सुनिता शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण आणि महिलांचा मान-सन्मान वाढवण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली आहे. तर अशा स्थितीत आमदार राहुल जगताप यांनी केलेले विधान नक्कीच शरद पवार यांना खटकणारे आहे. तुम्ही आपल्या आमदाराला या विधानावर समज देण्याची गरज आहे.” असे आवाहन सुनिता शिंदे यांनी केले आहे.

सुनिता शिंदे यांनी सुप्रिया सुळेंना पाठवलेले पत्र जसंच्या तसं :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *