...तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, बोंडअळीच्या प्रश्नावरुन भाजप आक्रमक

त्यामुळे बोंडअळीच्या मुद्द्यावर राजकारण तापत असल्याचे चित्र दिसत आहे. (BJP demand to Give Help to Farmer at Nandurbar District)

...तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, बोंडअळीच्या प्रश्नावरुन भाजप आक्रमक

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार जोपर्यंत बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करत नाही. तसेच याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देत नाही. तोपर्यंत नंदूरबारमध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने घेतली आहे. त्यामुळे बोंडअळीच्या मुद्द्यावर राजकारण तापत असल्याचे चित्र दिसत आहे. (BJP demand to Give Help to Farmer at Nandurbar District)

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जात असते. मात्र यावर्षी कापूस लागवडीपासूनच कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा कापसावर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे पीक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही आहे. त्यामुळे सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करा, अशी मागणी वारंवार भाजपकडून केली जात आहे.

जर ही मागणी मान्य केली नाही, तर नंदूरबार जिल्ह्यात एकाही मंत्र्यांला फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सातत्याने याबाबतची मागणी केली जात आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत नसल्याने भाजपने हा पावित्रा घेतला आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रश्नावरून राजकारण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे(BJP demand to Give Help to Farmer at Nandurbar District)

संबंधित बातम्या : 

सोलापूर एसटीला मोठा दिलासा, प्रवासी उत्पन्नात राज्यात चौथा क्रमांक, तर कार्तिक यात्रेतील खिलार जनावरांचा बाजार रद्द

कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *