'शिवाजीचे उदात्तीकरण, पडद्यामागचे वास्तव' पुस्तकावर बंदी घाला, भाजपची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली (bjp demands Ban to Shivajiche Udattikaran book) आहे.

bjp demands to Ban Shivajiche Udattikaran book, ‘शिवाजीचे उदात्तीकरण, पडद्यामागचे वास्तव’ पुस्तकावर बंदी घाला, भाजपची मागणी

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली (bjp demands Ban to Shivajiche Udattikaran book) आहे. या दरम्यान एका पुस्तकावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘शिवाजीचे उदात्तीकरण, पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी भाजपने केली आहे. या संदर्भातील एक पत्रही भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘शिवाजीचे उदात्तीकरण, पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आलं आहे. डॉक्टर विनोद अनाव्रत या लेखकाच्या या पुस्तकावर बंदी आणून लेखकास तसेच पुस्तक प्रकाशिक करणाऱ्या सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालकावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशीही मागणी भाजपने या पत्राद्वारे केली आहे.

हे पुस्तक वाचताना तळपायाची आग मस्तकात जाते. या पुस्तकात प्रत्येक वाक्यागणिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या पुस्तकातील उतारे विशिष्ट समुदायातील मंडळी सोशल मीडियावर वेगाने प्रसारित करत आहेत. शिवाजी महाराजांना दूषणे देण्यासाठी हे पुस्तक म्हणजे शिवद्रोही लोकांसाठी एक संदर्भग्रंथ बनला आहे. हे पुस्तक एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराज, मराठा समाज आणि ब्राम्हण या सगळ्यांना केवळ टार्गेट करणारे नाही, तर त्यांच्याविषयी सूडाची आणि द्वेषाची भावना निर्माण करणारे आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले (bjp demands Ban to Shivajiche Udattikaran book) आहे.

‘शिवाजीचे उदात्तीकरण, पडद्यामागचे वास्तव’ हे या पुस्तकाचे शीर्षकच मुळात आक्षेपार्ह आहे. शीर्षकासकट संपूर्ण पुस्तकात लेखाने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. तसा तो इतरही अनेक इतिहासलेख करत असतात, पण या पुस्तकाच्या लेखकाचा असा एकेरी उल्लेख करण्यामागील उद्देश महाराजांच्या विषयी तुच्छताभाव दाखवणे हाच आहे.

यासह इतर अनेक कारण लिहित भाजपने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजपने अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली (bjp demands Ban to Shivajiche Udattikaran book) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *