निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना भेटू नका; आपली मैत्री, संबंध सर्व…. भाजप नेत्याचा कार्यकर्त्यांना सल्ला

अंबरनाथमधील शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राजेश वानखेडे यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना भेटू नका; आपली मैत्री, संबंध सर्व.... भाजप नेत्याचा कार्यकर्त्यांना सल्ला
भाजप नेत्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 9:27 AM

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच आता भाजपच्या एका जिल्हाध्यक्षांनी महायुतीतील कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू नका, ‘आपली मैत्री, आपले संबंध सगळे २० तारखेनंतर, असा सल्ला भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी दिला आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

“फोनवरूनच शुभेच्छा द्या”

महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. त्यातच आता अंबरनाथमधील शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राजेश वानखेडे यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन आता भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी एका मेळाव्यात कानपिचक्या दिल्या. ‘निवडणुका होईपर्यंत कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना भेटू नका. त्यांना सांगा फोनवरूनच शुभेच्छा द्या. आपली मैत्री, आपले संबंध २० तारखेनंतर.. तोपर्यंत फक्त राजकारण, निवडणुका आणि महायुती, असे नाना सूर्यवंशी म्हणाले.

“आपली मैत्री, आपले संबंध बाजूला ठेवा”

निवडणुकीच्या काळात आपला वाढदिवस असेल तर एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्ता आपल्याला भेटायला येतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून संभ्रम निर्माण करतो. त्यामुळे 20 तारखेपर्यंत आपली मैत्री, आपले संबंध बाजूला ठेवा आणि कुणालाही भेटू नका. फोनवरून शुभेच्छा स्वीकारा. त्यांना सांगा तुमच्या निवडणुका तुम्ही लढा, आमच्या निवडणुका आम्ही लढतो. बाकी सगळं २० तारखेनंतर… असे भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सुनील चौधरींनी दिले वानखेडेंच्या भेटीमागे स्पष्टीकरण

“येत्या २० तारखेपर्यंत फक्त राजकारण, निवडणूक, महायुती आणि धनुष्यबाण इतकंच लक्षात ठेवा, असं नाना सूर्यवंशी म्हणाले. नाना सूर्यवंशी यांच्या या वक्तव्यानंतर आता सुनील चौधरी यांनी वानखेडेंच्या भेटीमागे स्पष्टीकरण दिले. राजेश वानखेडे हे माझे जुने मित्र आहेत. ते भाजपात असताना आम्ही युती म्हणून एकत्र काम केलं होतं. त्यामुळे ते माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले, पण यात राजकीय काहीही नाही”, असे सुनील चौधरी यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.