भाजपच्या माजी आमदाराचे कृषी कायद्यांवर पुस्तक, गडकरींच्या हस्ते प्रकाशन

भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी कृषी कायद्यांची माहिती देणारं एक पुस्तक लिहिलं आहे. (Mallikarjuna Reddy farmers law)

भाजपच्या माजी आमदाराचे कृषी कायद्यांवर पुस्तक, गडकरींच्या हस्ते प्रकाशन
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:03 PM

नागपूर : कृषी कायद्यांना देशातील शेतकऱ्यांचा विरोध (Farmers protest against farm law) आणि ग्रामपंचायत निवडणूकीची (Gram panchayat elections) पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी कृषी कायद्यांची माहिती देणारं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव ‘कृषी विधेयक 2020’ असून त्याचे प्रकाशन केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. (bjp former MLA Mallikarjuna Reddy written book on farmers law)

ग्रामपंचायत निवडणुका आणि पुस्तक प्रकाशन

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना देशभरातून विरोध होतोय. दिल्लीच्या सीमेवर अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. असे असताना राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकीमध्ये मतदान करणाऱा वर्ग हा शेतकरी आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करणारा असल्यामुळे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी किती पुरक आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचं सांगितलं जातंय. राष्ट्रीय स्तरावर सभा, बैठकांच्या माध्यमातून भाजपकडून हे काम सुरु आहे. तसेच, पुस्तकाच्या माध्यमातूनही कृषी कायद्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

दरम्यान, मल्लिकार्जुन रेड्डी यांनी लिहिलेलं हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. तसेच, हे पुस्तक शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या छोटेखानी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आज शेतकरी- केंद्र सरकार यांच्यात चर्चेची आठवी फेरी

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून विरोध होतो आहे. मागील 40 दिवसांपून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र अद्याप सर्वमान्य असा कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यानंतर आता आज ( 4 जानेवारी) पुन्हा शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची आठवी फेरी होणार आहे. या चर्चेमधून तोडगा निघणार का?, हे पाहणं आता महत्त्वाचं ठऱणार आहे.

संबंधित बातम्या :

दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा 37 वा दिवस; नववर्षानिमित्त शेतकऱ्यांनी काय केलं?

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 7 वी बैठक संपली, अद्यापही तोडगा नाहीच

हाफ चड्डी घालून भाषणं करणे हा राष्ट्रवाद नव्हे; शेतकऱ्यांचे हित पाहणे हा खरा राष्ट्रवाद: सचिन पायलट

(bjp former MLA Mallikarjuna Reddy written book on farmers law)

Non Stop LIVE Update
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.