राम कदमांमुळे भाजपची पुन्हा पुन्हा डोकेदुखी?

त्यांनी थेट पोलिसांनाच फोन केलाय आणि प्रकरण मिटवण्याची विनंती केल्यानं ते पुन्हा एकदा वादात सापडलेत. 

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:44 PM, 11 Jan 2021
Ram Kadam

मुंबईः भाजपचे नेते राम कदम हे वादग्रस्त विधानांवरून नेहमीच चर्चेत असतात. अनेक प्रकरणात ते ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना पाहायला मिळतात. वाद आणि राम कदम हेसुद्धा जणू काही आता समीकरणच झालंय. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो यावरून राम कदम नेहमीच वादात सापडलेत. आता पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी थेट पोलिसांनाच फोन केलाय आणि प्रकरण मिटवण्याची विनंती केल्यानं ते पुन्हा एकदा वादात सापडलेत.  (BJP headaches again and again due to Ram Kadam?)

मुलगी पळवून आणून तिचे त्या तरुणाशी लग्न लावून देईन : राम कदम
गेल्या काही महिन्यापूर्वी मुंबई येथील दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी युवकांसमोर बोलताना, ‘तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि ती तुम्हाला नकार देत असेल, तर ती मुलगी पळवून आणून तिचे त्या तरुणाशी लग्न लावून देईन’, असे बेताल वक्तव्य केले होते. यानंतर सबंध राज्यभर आमदार कदम यांच्यासह भाजपवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर राम कदम यांनी या प्रकरणावर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता.

मनसेचे आमदार असताना अबू आझमींना मारहाण
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत हिंदीत शपथ घेतली. हिंदीतून अबू आझमी शपथ घेत असताना मनसेच्या आमदार रमेश वांजळे यांनी त्यांच्यासमोरील माईक बाजूला केला. त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी अबू आझमींच्या कानातही वाजवली आणि लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली.
हिंदीतून शपथ घ्यायला मनसेचा विरोध होता. मात्र अबू आझमींनी हिंदीतून शपथ घ्य़ायचा हट्ट कायम ठेवल्याने त्यांना मनसेच्या आमदारांचा लाथा बुक्क्यांचा प्रसाद खावा लागला.

एक ट्विटमुळे राम कदम प्रचंड ट्रोल
राम कदम यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. त्यांनी टाइम्स स्क्वेअरच्या इमारतीवर प्रभू रामचंद्रांचा फोटो एडिट केला होता. मोदी है तो मुमकीन है या हॅश टॅगही त्यांनी फोटोसोबत जोडला होता. त्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.

मनसे आमदार राम कदमांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
घाटकोपर मतदारसंघाचे मनसेचे आमदार असताना राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राम कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात पार्कसाइट पोलिसांनी अॅट्रॉसिटी, अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली होती.

अर्णब गोस्वामींना मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निलंबन करण्याची मागणी
भाजपचे आमदार राम कदम यांनी अर्णब गोस्वामींच्या अटक प्रकरणात उपोषणही केलं होतं. तसेच ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली, त्यांचं निलंबन करावं, त्यासाठी त्यांनी गृहमंत्री आणि राज्यपालांना पत्रही लिहिलं होतं.

सुशांत सिंगची आत्महत्या नव्हे, हत्या, राम कदमांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातही राम कदमांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या चौकशीचा तपास 65 दिवस मुंबई पोलिसांकडे होता. रिया चक्रवर्तीचं चॅटही त्यांच्याकडे उपलब्ध होते. 65 दिवसांत एकालाही अटक नसल्याचं सांगत मुंबई पोलिसांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

संबंधित बातम्या

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींसाठी भाजप नेते राम कदमांचा फोन

BJP headaches again and again due to Ram Kadam?