बॅनरवर फोटो नाहीत, बैठकीचं निमंत्रण नाही, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे : महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. आमचे कोणाचे फोटो बॅनरवर दिसत नाही आणि आम्हाला बैठकांचं निमंत्रण दिलं जात नसल्याची खंत शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून पुण्यात व्यक्त करण्यात आली. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान ही तक्रार केली. विनायक मेटे यांचा शिवसंग्राम महायुतीचा घटकपक्ष असला तरी या पक्षाने बीडमध्ये भाजपशी फारकत […]

बॅनरवर फोटो नाहीत, बैठकीचं निमंत्रण नाही, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

पुणे : महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. आमचे कोणाचे फोटो बॅनरवर दिसत नाही आणि आम्हाला बैठकांचं निमंत्रण दिलं जात नसल्याची खंत शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून पुण्यात व्यक्त करण्यात आली. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान ही तक्रार केली.

विनायक मेटे यांचा शिवसंग्राम महायुतीचा घटकपक्ष असला तरी या पक्षाने बीडमध्ये भाजपशी फारकत घेतली होती. शिवाय भाजपशी फारकत घेऊन विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर भाजपसोबत रहायचं असेल, तर संपूर्ण राज्यात सोबत रहावं लागेल, अन्यथा गरज नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

बीडमध्ये विनायक मेटे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं जमत नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मेटेंचा बीड शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पराभव केला होता. यानंतर भाजपने मेटेंचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेवर नेलं. पण आपल्याला मंत्रीपद हवं यावर मेटे ठाम होते आणि हे मंत्रीपद पंकजा मुंडे यांच्यामुळे मिळालं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बीडमधील सभेतही त्यांनी हा आरोप केला.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.