Devendra Fadnavis Corona | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग

मी स्वतःला वेगळे करून घेतले असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

Devendra Fadnavis Corona | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनीच ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून, मी स्वतःला वेगळे करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. (Devendra Fadnavis corona positive)

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांना फडणवीसांनी भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांच्या संपर्कात अनेक नेते, गावकरी आले होते. याशिवाय त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍यांची भेट घेत फडणवीसांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी कुरकुंभ, दौंड, भिगवण, इंदापूर, परंडा, टेंभुर्णी येथील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. या भेटीदरम्यान त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


तसेच आतापर्यंत माझ्या जे जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी संपर्कात आलेल्या लोकांना दिला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, अशी माहिती ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी आपला मित्र आणि भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांना केली होती. फडणवीस-महाजन यांच्या फोनवरील संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर खुद्द महाजनांनीच अशी बातचित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

“नेते मंडळी, मंत्रिमंडळातील सदस्य, धनदांडगे मंडळी आहेत, ते ब्रिच कँडीमध्ये दाखल होतात. त्यांच्याकडे पैसे आहेत, ते होऊ शकतात, पण सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. साहेबांनाही (देवेंद्र फडणवीस) तेच वाटत होतं, की ठीक आहे कोणी ब्रिच कँडीला होईल, कोणी लीलावतीला होईल, कोणी जसलोकला होईल, कोणी बॉम्बे हॉस्पिटलला होईल, नेते मंडळी आहेत, आमदार-खासदार, मंत्री आहेत. पण मला जर कोरोना… होऊ नये, होणार नाही, पण कोरोनाची लागण झाली, तर मला मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, सेंट जॉर्जमध्येच दाखल करायचं, असं मला सांग” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची आठवण गिरीश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितली होती.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक जिंकण्यासाठी कोरोना लस नाही, महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देऊ : नवाब मलिक

Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *