आशिष शेलार कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना तपासणीचा सल्ला

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. bjp leader Ashish Shelar Corona Positive

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:35 AM, 15 Apr 2021
आशिष शेलार कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना तपासणीचा सल्ला
आशिष शेलार, भाजप

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चाललाय. आता कोरोनाचे रुग्ण उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळालीय. (bjp leader Ashish Shelar Corona Positive)

‘त्या’ सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलंय.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाचा संसर्ग

तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil corona) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली होती. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत उभे असलेले भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे (BJP Samadhan Autade) यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर त्यांनी चाचणी केली असता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. निवडणुकीच्या प्रमुख शिलेदारालाच विलगीकरणात जावे लागल्याने भाजपाला आणखी एक धक्का मानला जात आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. bjp leader Ashish Shelar Corona Positive

संबंधित बातम्या

Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन

मोठी बातमी! आता रेमडेसिव्हीरची कमतरता भासणार नाही, 4 मोठ्या औषध कंपन्यांचा दावा

bjp leader Ashish Shelar Corona Positive