Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना सुरु ठेवण्याबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana : "लाडक्या भावांसाठी कार्यप्रशिक्षण योजना आणली. त्यात 10 हजार रुपये, नोकरी देत आहोत. एवढच नाही, तर आपल्या शेतकऱ्यांना आता वीजेच बील माफ केलं आहे. शेतकऱ्यांना वीजेच बिल भरावं लागणार नाही" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना सुरु ठेवण्याबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 1:20 PM

“एकीकडे मायमाऊलीला मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. काही लोकांना ते पहावत नाहीय. काही लोक लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून हायकोर्टात गेले. मला दु:ख आहे, हायकोर्टात गेलेला व्यक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे. माझी त्यांना विनंती आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे की, लाडकी बहिण योजनेला राजकीय चष्म्यातून पाहू नका, विरोध करु नका” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

“ही योजना आपल्या सगळ्या बहिणींकरता तयार करण्यात आली आहे. बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्यानंतर बहिणींना त्याचं मोल समजतं. पण जे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत, त्यांना हे समजणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “दिवसभर राबणाऱ्या आमच्या बहिणींनी योजनेच मोल माहित आहे. आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्धार केला आहे, काहीही झालं तरी ही योजना बंद होऊ देणार नाही. योजना सुरु राहील, तुमचा आशिर्वाद जो पर्यंत पाठिशी आहे तो पर्यत ही योजना बंद होऊ शकणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“लाडक्या भावांसाठी कार्यप्रशिक्षण योजना आणली. त्यात 10 हजार रुपये, नोकरी देत आहोत. एवढच नाही, तर आपल्या शेतकऱ्यांना आता वीजेच बील माफ केलं आहे. शेतकऱ्यांना वीजेच बिल भरावं लागणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्.
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?.
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...