प्रचार समितीतून वगळल्याने एक नेता नाराज? दुसऱ्याचा काम करण्यास नकार; भाजपमध्ये मोठ्या घडामोडी?

महाराष्ट्र भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीची घोषणा केली. पण या प्रचारसमितीवरुन पक्षात नाराजी नाट्य रंगल्याचं बघायला मिळत आहे.

प्रचार समितीतून वगळल्याने एक नेता नाराज? दुसऱ्याचा काम करण्यास नकार; भाजपमध्ये मोठ्या घडामोडी?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 6:52 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगताना दिसत आहे. महाराष्ट्र भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक प्रचार समिती जाहीर करण्यात आली. या प्रचार समितीवरुन भाजपमधील दोन बडे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यापैकी एका नेत्याने तर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्याचं नाव माजी खासदार किरीट सोमय्या असं आहे. सोमय्या यांची पक्षाकडून आज निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली. पण तरीही ते नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचं कारण वेगळं आहे. तर दुसरं नाव आमदार प्रसाद लाड यांचं चर्चेत आहे. पण त्यांच्या नाराजीचं कारण वेगळं आहे. निवडणूक प्रचार समितीत आपलं नाव नसल्यामुळे प्रसाद लाड नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेली पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवल्याची माहिती समोर येत आहे. “मला न विचारता माझ्या नावाची पक्षाकडून घोषणा करण्यात आली. मला न विचारता घोषणा कशी? ही पद्धत चुकीची”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. आपल्या समितीचा मी सदस्य नसल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. दरम्यान निवडणूक प्रचार समितीमधून नाव वगळल्याने भाजप आमदार प्रसाद लाड हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे.

किरीट सोमय्या दानवेंना पाठवलेल्या पत्रात काय म्हणाले?

“आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी. 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हा पासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सदस्य / कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे”, असं किरीट सोमय्या पत्रात म्हणाले.

“मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जवाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतः ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करीत राहणार. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेश अध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो”, असंदेखील किरीट सोमय्या म्हणाले.

सोमय्या बावनकुळेंना काय म्हणाले?

“मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच (5 1/2) वर्ष, म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करीत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. 3 वेळा माझा वर जीवघेणे हल्ले ही झाले. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार”, असं किरीट सोमय्या यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.