भंडारा जिल्ह्यातील 10 बालकांचा मृत्यू नव्हे, त्या तर हत्या; राम शिंदे यांचा संताप

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला हा मृत्यू नसून ही हत्या आहे, असा संताप भाजप नेते राम शिंदे यांनी व्यक्त केला. (ram shinde bhandara hospital fire)

भंडारा जिल्ह्यातील 10 बालकांचा मृत्यू नव्हे, त्या तर हत्या; राम शिंदे यांचा संताप

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, बालकांचा हा मृत्यू नसून त्या हत्या आहेत, असा संताप भाजप नेते राम शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच सरकार असा निष्काळजीपणा आणखी किती दिवस करणार आहे, असा खडा सवालही त्यांनी राज्यातील महाविकास आघीडी सरकारला विचारला. (BJP leader ram shinde criticised maharashtra government vver bhandara hospital fire and 10 child death)

शनिवारी (9 जानेवारी) भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिट केअरमध्ये आग लगली. त्यानंतर बालकांच्या युनीट केअर कक्षामध्ये धूर जमा झाल्यामुळे 10 बालकांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते राम शिंदे यांनी तर या दुर्घटनेत बालकांचा मृत्यू नाही तर त्यांची हत्या झाली आहे, असे म्हणत संताप व्यक्त केलाय. तसेच राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे याआधी सुद्धा रुग्णालयात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत हा निष्काळजीपणा आणखी किती दिवस राहणार, असा खडा सवाल त्यांनी राज्य सरकारला यानिमित्त केला.

अन्यथा रस्त्यावर उतरु : चंद्रशेखर बावनकुळे

भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रसेखर बावनकुळे यांनीसुद्धा या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यांनी लकरात लवकर दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने वेळीच पाऊल उचललं नाही तर रस्त्यावर उतरण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी मुलांच्या अतिदक्षता विभागात 7 दिवसांपासून विजेचं फ्लक्च्यूएशन होत असल्याचं सांगितल आहे. ही माहिती त्यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांनी दिल्याचं  म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Bhandara Fire | ना आगरोधक यंत्रणा, ना स्मोक अलार्म, RTI च्या माहितीने प्रशासन उघडं

भंडाऱ्याच्या हलगर्जीपणाच्या चौकशीची फडणवीसांची मागणी, पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक

Bhandara Hospital Fire | भंडाऱ्यात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं! सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश

(BJP leader ram shinde criticised maharashtra government vver bhandara hospital fire and 10 child death)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI