केडीएमसीने ‘ते’ 1335 घरं ताब्यात घेतलीच नाहीत, आमदार गणपत गायकवाडांचा खुलासा

केडीएमसी क्षेत्रातील ULC कायदा अंतर्गातील 10 टक्के कोट्यातील 1335 घरे अद्याप महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलेली नाहीत. (Ganpat Gaikwad meet with KDMC commissioner Vijay Suryawanshi).

केडीएमसीने 'ते' 1335 घरं ताब्यात घेतलीच नाहीत, आमदार गणपत गायकवाडांचा खुलासा

कल्याण (ठाणे) : केडीएमसी क्षेत्रातील ULC कायदा अंतर्गातील 10 टक्के कोट्यातील 1335 घरे अद्याप महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलेली नाहीत. याबाबतचा खुलासा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी माहिती अधिकारातून याबाबतची माहिती मिळवली. केडीएमसीकडून ULC कायद्यातील घरे घेण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गायकवाड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन घरे विकणाऱ्या बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन भाडे उकळणाऱ्यांकडून भाडे वसूल करण्याची मागणी करणार आहेत (Ganpat Gaikwad meet with KDMC commissioner Vijay Suryawanshi).

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विशेष करुन कल्याण पूव्रेतील विविध समस्या संदर्भात कल्याण पूर्व विधानसभेचे भाजप आमदार गायकवाड यांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याची भेट घेतली. एकंदरीत 14 समस्यांवर गायकवाड यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. कल्याण-पुणे लिंक रोडवरील अर्धवट कॉन्क्रीटीकरणाचे काम, ड्रेनेजचे निकृष्ट दर्जाचे काम या विषयांकडे गायकवाड यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी प्रत्यक्ष त्याठीकाणी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. या दरम्यान गायकवाड यांनी ULC कायदा अंतर्गातील दहा टक्के कोट्यातील 1335 घरांबाबत प्रश्न सुद्धा आयुक्तांकडे उपस्थित केला. यावर आयुक्तांनी हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडा, हा विषय माझ्या अधिकारातील नाही, असं सांगितलं.

गणपत गायकवाड आता या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. 1335 घरांपैकी अनेक घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही घरे भाड्याने दिली आहेत. घरं विकणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा. भाडे घेणाऱ्यांकडून वसूल करा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करु, अशी माहिती गणपत गायकवाड यांनी दिली (Ganpat Gaikwad meet with KDMC commissioner Vijay Suryawanshi).

हेही वाचा : पडलेल्या पोकलेनचा फोटो, अर्धवट कोपर पुलाचं काम, मनसे आमदार राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI