10 ते 2 दरम्यान शिथिलता, मग तेव्हा कोरोना होत नाही का? : उदयनराजे

10 ते 2 दरम्यान शिथिलता दिली, मग तेव्हा कोरोना होत नाही का? असा प्रश्नही उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला. (Udayanraje Bhosale On Corona and Lockdown) 

10 ते 2 दरम्यान शिथिलता, मग तेव्हा कोरोना होत नाही का? : उदयनराजे
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 4:04 PM

सातारा : “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. यामुळे सर्व ठिकाणी एकदम शिथीलता देणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्प्याने शिथीलता देणे गरजेचे आहे,” असे मत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. 10 ते 2 दरम्यान शिथिलता दिली, मग तेव्हा कोरोना होत नाही का? असा प्रश्नही उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला. (Udayanraje Bhosale On Corona and Lockdown)

उदयनराजे यांनी आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊन शिथील करण्याबाबत चर्चा केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नव्हे. सर्वच ठिकाणी एकदम शिथीलता देणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्प्याने शिथीलता देणे गरजेचे आहे. तसेच 10 ते 2 या वेळेत शिथीलता दिली म्हणजे या वेळेत कोरोना नसतो का?” असा मिश्किल टिप्पणीही उदयनराजे यांनी केली.

“शंभर वर्षातून एकदा अशा पद्धतीने कोरोनासारखी परिस्थिती उद्भवते. या परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता ही एक शिकवण आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाहीत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लवकरात लवकर यावर लस निघावी अशी ईश्वराला त्यांनी प्रार्थना केली,” असे उदयनराजे म्हणाले. (Udayanraje Bhosale On Corona and Lockdown)

उदयनराजेंच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्या

  1. सातारा जिल्ह्याकरीता टास्क फोर्स स्थापित करणे.
  2. एफसीएमआर च्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे.
  3. शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची कार्यक्षमता जास्तीत जास्त उपयोगात आणणे.
  4. कोणतेही लक्षण नसलेल्या कोविड रुग्णांना घरच्या घरी उपचार घेणे कामी प्रोत्साहित करणे.
  5. शासकीय किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडिसिन असलेल्या फिजीशियन्सची चांगल्या प्रमाणात प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे.
  6. सर्वसाधारण रुग्णालय फक्त कोविड-१९ च्या रुग्णांसाठी समर्पित करणे व अन्य रोगाचे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचारार्थ पाठविणे.
  7. डब्ल्यूयुआययडी टास्क फोर्स समितीने सुचवलेप्रमाणे रुग्णांना डिस्चार्ज देणेबाबत धोरण ठरवणे.
  8. सर्वसाधारण रुग्णालयांच्या कोविड सोडून इतर रुग्णांसाठी आर्यांग्ल हॉस्पिटलचा पर्याय निर्माण करून तो पर्याय राबविणे.

संबंधित बातम्या : 

युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे, न्यायालयाने आदेश काढावा : प्रकाश आंबेडकर

राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.