BJP Protest : मंदिरं खुली करण्यासाठी भाजप आक्रमक, राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपनं राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू केलंय. पंढरपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगरसह राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन होत आहे.

| Updated on: Aug 30, 2021 | 12:09 PM
राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीवर भाजप आक्रमक झालाय.

1 / 14
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपनं राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू केलंय.

2 / 14
पंढरपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगरसह राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन होत आहे.

3 / 14
पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर भाविकांसाठी दर्शनास उघडावे या मागणीसाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने विठ्ठल मंदिराजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

4 / 14
यावेळी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

5 / 14
राज्यातील मंदिरं सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपने पुण्यातही आंदोलन केलं.

6 / 14
पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मंदिराबाहेर भाजपने आंदोलन केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.

7 / 14
नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

8 / 14
नाशिकमध्येही भाजप अध्यात्मिक आघाडीने शंखनाद आंदोलन केलं. रामकुंडावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी साधू महंतांचीही उपस्थिती होती. साधू महंतांनी आंदोलनात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मंदिर बंद विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

9 / 14
औरंगाबादमध्ये तर भाजपचे कार्यकर्ते मंदिराच्या गेटवर चढलेले पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी मंदिराच्या गेटवर चढून आरती केली. एकूणच मंदिर उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

10 / 14
अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं.

11 / 14
बीडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंख नाद आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अनेक कार्यकर्त्यांसह श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला. तसेच आजपासून सरकारचे नियम पाळणार नाही. आजपासून भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील अशी घोषणा केली.

12 / 14
राज्य सरकार एकीकडे बियर बार हॉटेल चालू करण्यास परवानगी देत असताना मंदिर बंद का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धवा अजब तुझे सरकारच्या घोषणा देखील देण्यात आल्या. 

13 / 14
 राज्यातील धार्मिक स्थळं व मंदिरं खुली करण्यात यावीत. या मागणीसाठी भाजप प्रदेश अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज राज्यभर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी आंदोलन पुकारण्यात आले. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथे श्रीराम मंदिर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले.

14 / 14
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.