औरंगाबादेत भाजप-आरएसएसच्या बैठकीत नेमकं काय शिजलं?

या बैठकीत (RSS BJP meeting) संघाने भाजपला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली असल्याचीही चर्चा सुरू आहे. बैठकीतून बाहेर पडताना नेत्यांनी बैठकीत काय झालं यावर बोलण्यास नकार दिला.

औरंगाबादेत भाजप-आरएसएसच्या बैठकीत नेमकं काय शिजलं?

औरंगाबाद : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. आरएसएसने भाजपच्या (RSS BJP meeting) अनेक मोठ्या नेत्यांची औरंगाबादमध्ये गुप्त बैठक घेतली. या बैठकीला (RSS BJP meeting) भाजप आणि संघाचे अनेक बडे नेते उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या बैठकीत (RSS BJP meeting) संघाने भाजपला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली असल्याचीही चर्चा सुरू आहे. बैठकीतून बाहेर पडताना नेत्यांनी बैठकीत काय झालं यावर बोलण्यास नकार दिला.

मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. एरवी उद्योग विश्वाच्या कार्यक्रमांसाठी चर्चेत असलेलं हे सभागृह आज मात्र एका राजकीय बैठकीमुळे चर्चेत आलं. आरएसएस आणि भाजपच्या गुप्त बैठकीसाठी सकाळपासूनच या सभागृहात नेत्यांची ची रेलचेल सुरू होती.

बैठक राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, बबनराव लोणीकर, जयकुमार रावल हे बैठकीला हजर होते. त्यामुळे या बैठकीचं गूढ अधिक वाढलं. पण ही संघाची नियमित बैठक असून त्यात राजकीय चर्चा होणार नसल्याचं संघाचे माध्यम समन्वयक वामनराव देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

मराठवाडा आणि खान्देशावर चर्चा

राजकीय बैठक नसली असं सांगितलं जात असलं तरी यात (RSS BJP meeting) बरंच काही शिजल्याची सूत्रांची माहिती आहे. ही बैठक मराठवाडा आणि खान्देशातील विधानसभेच्या जागांवर सखोल चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आली. मराठवाडा आणि खान्देशात भाजपचे असलेले मंत्री आणि खासदार त्यांची असलेली कामगिरी, त्यांच्या झालेल्या चुका, त्यांचा विधानसभेवर काय परिणाम होऊ शकतो, मराठवाडा आणि खान्देशात मराठा क्रांती मोर्चा, भीमा कोरेगाव दंगल, मराठा आरक्षण, नाराज असलेला ओबीसी वर्ग आणि वंचित बहुजन आघाडीने बिघडवलेली राजकीय समीकरणे यावरही विस्तृत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

खराब कामगिरी असलेल्या आमदारांना डच्चू?

मराठवाडा आणि खान्देशातील काही आमदारांच्या कामगिरीवर संघ नाराज असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. येणाऱ्या विधानसभेला या आमदारांची उमेदवारी कापली जाऊ शकते. त्यामुळे निर्माण होणारी राजकीय परिस्थिती यावरही या बैठकीत (RSS BJP meeting) चर्चा झाल्याचं समोर येत आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यांपैकी भाजपकडे फक्त 17 जागा आहेत. याच जागा 30 पर्यंत कशा वाढवता येतील याचीही रणनीती या बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संघ हा राजकीय बाबतीत हस्तक्षेप करत नाही अशी चर्चा होती. पण निवडणुकांच्या तोंडावर संघाने भाजपसोबत गुप्त स्वरुपाच्या समन्वय बैठका सुरु केल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरही संघाने हेडगेवार रुग्णालयात अशीच एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती, ज्या बैठकीनंतर लोकसभेला मराठवाद्यात भाजपची ताकत वाढली. आता विधानसभेलाही संघाने ही गुप्त बैठक घेतल्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा आणि खान्देशात राजकीय गणिते बदलतील का अशी चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीमुळे भाजपचे पदाधिकारी जितके सुखावले असतील तितकाच विरोधकांनी या बैठकीचा धसका घेतला आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *