ठाकरे की पाटील?; नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन शिवसेना विरुद्ध भाजप

नवी मुंबईतील विमानतळाच्या नामांतराचा वाद आगामी काळात चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. (bjp wants Navi Mumbai international airport to be named after d. b. patil)

ठाकरे की पाटील?; नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन शिवसेना विरुद्ध भाजप
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 2:59 PM

नवी मुंबई: नवी मुंबईतील विमानतळाच्या नामांतराचा वाद आगामी काळात चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेने या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर भाजपने लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी रेटली आहे. त्यामुळे ठाकरे की पाटील? या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. (bjp wants Navi Mumbai international airport to be named after d. b. patil)

स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईतील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने सक्तीने जमिनी संपादित केल्या होत्या. भूमिपुत्रांना या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा म्हणून दि. बा. पाटील यांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे या विनातळाला त्यांचे नाव देणं योग्य होईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचाही पाटलांच्या नावाला विरोध नसेल, असं सांगतानाच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरात राजकारण होऊ नये, असं आवाहन ठाकूर यांनी केलं आहे.

तर, या आधीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. बाळासाहेबांचं योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या गौरव म्हणून या विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी शिंदे यांनी केली होती.

कोण आहेत दि. बा. पाटील?

दि. बा. पाटील यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. त्यांचा जन्म उरण तालुक्यातील जासई येथे 13 जानेवारी 1926 रोजी झाला. ते पेशाने वकील होते. तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. पनवेलचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातून झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने उभारली. प्रसंगी तुरुंगवासही भोगला. शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. नवी मुंबईतील अनेक विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी अनेक नेते आणि कार्यकर्तेही घडवले आहेत.

सिडकोकडून नवी मुंबईची उभारणी केली जात होती. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. पण योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. शेतकऱ्यांच्या या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिबांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला होता. (bjp wants Navi Mumbai international airport to be named after d. b. patil)

संबंधित बातम्या:

“भुजबळ, वडेट्टीवारांच्या पाठीशी बारा बलुतेदार, गरज पडली तर रस्त्यावर उतरु”

MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी

चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊ नका; मनसेची भूमिका

(bjp wants Navi Mumbai international airport to be named after d. b. patil)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.