खोतांच्या दुखत्या नसीवर कोण बोट ठेवतंय?- आत्मनिर्भर Vs कडकनाथ

भाजप अणि रयत संघटनेने काढलेल्या आत्मनिभर्र यात्रेचा आज इस्लापमुरात समारोप होणार आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्राही आज इस्लामपुरात दाखल होणार आहे.

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 10:41 AM, 27 Dec 2020
खोतांच्या दुखत्या नसीवर कोण बोट ठेवतंय?- आत्मनिर्भर Vs कडकनाथ

सांगली : भाजप अणि रयत संघटनेने काढलेल्या आत्मनिभर्र यात्रेचा आज इस्लापमुरात समारोप होणार आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्राही आज इस्लामपुरात दाखल होणार आहे. भाजपच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमात कडकनाथ कोंबड्या उधळू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे आज इस्लामपुरात दोन्ही यात्रांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. (BJP’s Aatmnirbhar yatra and Swabhimani Shetkari Saghtana Kadaknath Sangharsh Yatra in Islampur)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कडकनाथ संघर्ष यात्रा काढली जात आहे. ही यात्रा आज दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. सांगलीतील स्टेशन चौक ते इस्लामपूरदरम्यान ही मोटारसायकल यात्रा काढण्यात येणार आहे. कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात अनेक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती, लाखो रुपये कमावण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर काही राज्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कडकनाथ कोबडी व्यवसायात लाखो रूपये गुंतवले होते. नंतर यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती.

याप्रकरणी गुन्हा नोंद होऊन अनेक लोकांना अटकही झाली होती. सांगली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलाचा, सागर खोत यांचा हात आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक नेत्यांनी केला होता. ज्या कंपनीने शेतकऱ्यांना गंडा घातला ती कंपनी सदाभाऊ यांच्याशी संबधित लोकांची होती, असाही आरोप त्यावेळी झाला.

केंद्र सरकारने नुकतेच काही कृषी कायदे केले आहेत. या कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि मग आत्मनिर्भर यात्रा काढावी, तसेच आम्हीही कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेवून कडकनाथ यात्रा काढू. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इस्लामपूरमध्ये होणाऱ्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमात कडकनाथ कोंबड्या उधळू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी याआधीच दिला आहे.

दरम्यान, आज कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप अणि रयत संघटनेने काढलेली आत्मनिभर्र यात्रा इस्लामपूरमध्ये येणार आहे, तर त्याचदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्राही इस्लामपूरमध्ये पोहचणार आहे. त्यामुळे या दोन्ही यात्रेदरम्यान संघर्ष होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे, सदाभाऊंचा पवारांवर हल्लाबोल

यात्रा सदाभाऊ खोतांची, सारथी भाजप नेते; वाचा ‘किसान आत्मनिर्भर यात्रे’चा संपूर्ण कार्यक्रम

(BJP’s Aatmnirbhar yatra and Swabhimani Shetkari Saghtana Kadaknath Sangharsh Yatra in Islampur)