राज्यात रक्ताचा तुटवडा; पोलिसांकडून रक्तदान; 2000 पिशव्या रक्त जमवण्याचे उद्दिष्ट

तसेच रुग्णालयातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच काही कोरोना रुग्ण गंभीर असून, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताचीही गरज लागतेय.

  • मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर
  • Published On - 17:14 PM, 6 Apr 2021
राज्यात रक्ताचा तुटवडा; पोलिसांकडून रक्तदान; 2000 पिशव्या रक्त जमवण्याचे उद्दिष्ट
Blood donation from police palghar

पालघरः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरूनही बरेच प्रयत्न सुरू आहेत. तसेच रुग्णालयातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच काही कोरोना रुग्ण गंभीर असून, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताचीही गरज लागतेय. (Blood shortage in the state; Blood donation from police; Aim for 2000 bags of blood donation)

राज्यात पुन्हा एकदा रक्ताची गरज वाढली

महाराष्ट्रभर एकीकडे वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात रक्ताची गरज वाढली असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. राज्याला आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आल्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पालघर पोलीस दलामार्फत रक्तदानाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय.

पूर्ण पालघर जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पूर्ण पालघर जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आलेय. आज बोईसर येथे टीमा हॉल येथे रक्तदान शिबिराचे पालघर पोलीस दलाकडून आयोजन करण्यात आले, अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्वतः ही रक्तदान करून लोकांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले, जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्या जमा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी tv9 मराठीला सांगितले.

बोईसर उपविभागीय पोलीस क्षेत्रातील पोलिसांचं रक्तदान

पतंगशाह कुटीर रुग्णालय जव्हार आणि जे जे हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या सोबत ह्या रक्तदान संकलन शिबिराचे आयोजन करण्यात आले. बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या क्षेत्रातील बोईसर पोलीस ठाणे, वानगाव पोलीस ठाणे, तारापूर पोलीस ठाणे या सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केलेय. पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलेल्या रक्तदान आव्हानाला बोईसर येथील विविध सामाजिक संघटना, शहरातील नागरिक, पत्रकार तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात भाग घेतला होता.

संबंधित बातम्या

Corona Update : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 पैकी 7 शहरे एकट्या महाराष्ट्रातील!

मुंबईत कोरोना फोफावतोय, लॉकडाऊनबाबत पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Blood shortage in the state; Blood donation from police; Aim for 2000 bags of blood donation