नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत सुमारे 50 जणांसह बोट बुडाली, 5 मृतदेह हाती

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंटजवळ नर्मदा नदीत बोट बुडाली आहे. या बोटीत सुमारे 50 जण असल्याची माहिती आहे. त्यापैकी 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर जवळपास 42 जणांना वाचवण्यात यश आलं.  भुश्या पॉईंट हा दुर्गम भाग आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदतीसाठी बचावपथक धाडलं आहे. या घटनेची माहिती परिसरातील रहिवाशांना मिळाल्यानंतर त्यांनीही मदतीसाठी …

नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत सुमारे 50 जणांसह बोट बुडाली, 5 मृतदेह हाती

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंटजवळ नर्मदा नदीत बोट बुडाली आहे. या बोटीत सुमारे 50 जण असल्याची माहिती आहे. त्यापैकी 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर जवळपास 42 जणांना वाचवण्यात यश आलं.  भुश्या पॉईंट हा दुर्गम भाग आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदतीसाठी बचावपथक धाडलं आहे. या घटनेची माहिती परिसरातील रहिवाशांना मिळाल्यानंतर त्यांनीही मदतीसाठी धाव घेतली.  बुडालेल्या काही जणांना बाहेर काढलं आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बोटीतील अनेकजण तेलखेडी इथले असल्याचं समजतंय. मकर संक्रातीच्या पूजेसाठी भाविक नर्मदा नदीत उतरल्याची माहिती मिळतेय.

या बोट दुर्घटनेनंतर बचावपथकाच्या हाती 5 मृतदेह लागले. अद्याप मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. भुश्या पॉईंट हा सरदार सरोवराच्या मागील भाग आहे. हा भाग अतिशय दुर्गम आहे. इथे मोबाईलला रेंज मिळत नाही, रस्ते नीट नाहीत, प्रवासाची सुविधा नाही.

मकर संक्रातीच्या मुहूर्तावर नर्मदा नदीच्या पूजेसाठी दरवर्षी इथे अनेक भाविक येतात. यंदाही अनेक भाविक बोटीतून पूजेसाठी जात होते. त्यावेळी बोट उलटल्याने भाविकांवर काळाने घाला घातला.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *