हिमालयाएवढं दु:ख पचवून लेकाची अंत्ययात्रा, बॉक्सर प्रणवला डीजेच्या तालावर अखेरचा निरोप!

नागपुरात एक अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघाली. अंत्ययात्रेत डीजे लावल्याने (DJ in boxer Pranav Rauts funeral ) राज्यभरात एकच चर्चेचा विषय आहे.

हिमालयाएवढं दु:ख पचवून लेकाची अंत्ययात्रा, बॉक्सर प्रणवला डीजेच्या तालावर अखेरचा निरोप!
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 9:53 AM

नागपूर : लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी हे दृश्‍य नवीन नाही. मात्र, नागपुरात एक अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघाली. अंत्ययात्रेत डीजे लावल्याने (DJ in boxer Pranav Rauts funeral ) राज्यभरात एकच चर्चेचा विषय आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची ही अंत्ययात्रा (DJ in boxer Pranav Rauts funeral ) होती. 22 वर्षीय प्रणवने चार दिवसापूर्वी 21 फेब्रुवारीला अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत गळफास (Akola Boxer Pranav Raut Suicide) घेतला.

प्रणवची अंत्ययात्रा नागपूरमध्ये निघाली. त्यामध्ये डीजे लावण्यात आला होता. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दु:ख होते, सारे शोकमग्न होते आणि डोळ्यात अश्रू तरळत होते.

प्रणवने राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. तो अकोल्यातील क्रीडा प्रबोधिनीत सराव करत होता. मात्र इथल्याच वसतिगृहातील खोलीत त्याने गळफास लावून आयुष्य संपवलं. राष्ट्रीय संघात निवड झाली नसल्याचं शल्य प्रणवला बोचत होतं. त्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचललं.

प्रणवने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात वडिलांची माफी मागितली. ‘बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केले नाही’, असं त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं.  प्रणवने ऐन उमेदीच्या वयात अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याचा सर्वांना धक्का बसला. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अकोल्यासह राज्यभरातील क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या 

22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.