फुटलेला फुगा फुगवताना चिमुकल्याचा मृत्यू

नागपूर: फुगा फुगवत असताना एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. फुटलेला फुगा फुगवताना तो श्वसननलिकेत अडकल्याने 6 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. सानिध्य उरकुडे असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. नागपुरातील महाल परिसरातील किल्ला रोड भागात ही धक्कादायक घटना घडली. लहान मुलांना फुगे फुगवण्याची सवय असते. सानिध्यलाही फुटलेला फुगा सापडला होता. त्या फुग्याचा …

फुटलेला फुगा फुगवताना चिमुकल्याचा मृत्यू

नागपूर: फुगा फुगवत असताना एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. फुटलेला फुगा फुगवताना तो श्वसननलिकेत अडकल्याने 6 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. सानिध्य उरकुडे असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. नागपुरातील महाल परिसरातील किल्ला रोड भागात ही धक्कादायक घटना घडली.

लहान मुलांना फुगे फुगवण्याची सवय असते. सानिध्यलाही फुटलेला फुगा सापडला होता. त्या फुग्याचा फुटलेला भाग हातात पकडून दुसऱ्या बाजूने तो फुगा फुगवण्याचा प्रयत्न सानिध्य करत हो्ता््॓॓॓. मात्र त्याचवेळी तो फुगा सानिध्यच्या घशात गेला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सानिध्यला काहीही करता येईना. तो फुगा सानिध्यच्या श्वसननलिकेत अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सानिध्यच्या या मृत्यूमुळे महाल परिसरातील किल्ला रोड भागात एकच खळबळ उडाली आहे.

लहान मुले असो वा वयस्कर, सर्वांना फुगा सापडला की ती फुगवायची सवय असते. बर्थ डेच्या ठिकाणी असो किंवा रस्त्यावर मिळणारे फुगे असो, हे फुगे घेऊन लहान मुलांना ते फुगवून दाखवणे किंवा लहान मुले स्वत: फुगे फुगवत असताना आपण पाहिलं आहे. मात्र हेच फुगे किती धोकादायक असू शकतात हे सानिध्यच्या दुर्दैवी मृत्यूवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *