मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन मित्राच्या अंगावर पडला, सुखरुप बचावला!

यवतमाळ : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय यवतमाळमधील पुसद शहरात पाहायला मिळाला. पतंग आणण्यासाठी चढलेला स्वप्नील झगरे हा शाळकरी मुलगा तीन मजली इमारतीवरून पतंगीसह खाली पडला. पण या थरारक घटनेनंतरही तो आश्चर्यकारकरित्या बचावला. स्वप्नील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला खरा, पण खाली त्याचा मित्र उभा असल्याने तो वाचला. त्याचा मित्र खाली पडलेला पतंग […]

मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन मित्राच्या अंगावर पडला, सुखरुप बचावला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

यवतमाळ : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय यवतमाळमधील पुसद शहरात पाहायला मिळाला. पतंग आणण्यासाठी चढलेला स्वप्नील झगरे हा शाळकरी मुलगा तीन मजली इमारतीवरून पतंगीसह खाली पडला. पण या थरारक घटनेनंतरही तो आश्चर्यकारकरित्या बचावला.

स्वप्नील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला खरा, पण खाली त्याचा मित्र उभा असल्याने तो वाचला. त्याचा मित्र खाली पडलेला पतंग घेण्यासाठी वाकला आणि त्याच्या पाठीवर वरुन स्वप्नील पडला. आपला विश्वास बसणार नाही, पण या थरारक घटनेतून स्वप्नील सुदैवाने आश्चर्यकारकरित्या बचावला.

या थरकाप उडवणाऱ्या गोष्टीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे स्वप्नील आणि त्याचा मित्र अमोघ तगलपल्लेवार हे चौबारा परिसरात खेळत होते.

स्वप्नीलला इमारतीच्या उंच टोकावर पतंग दिसला. पतंग काढण्यासाठी स्वप्नील छतावर चढला आणि त्याचा मित्र अमोघ तगलपल्लेवार खाली थांबला होता. पतंग काढण्याच्या नादात स्वप्नीलचा तोल गेला आणि तो पतंगासह सर्व्हिसलाईन वीजेच्या तारेवर पडला. त्याच्या झटक्याने तार तुटली आणि तो खाली कोसळला. नेमका पतंग पकडण्यासाठी वाकलेल्या मित्राच्या पाठीवर पडला, यावेळी क्षणभर कुणाला काही कळले नाही, पण दुसर्‍याक्षणी उठून बसत स्वप्नील मित्रांसह पतंग घेऊन निघून गेला.

स्वप्नीलची आई स्वाती झगरे कामावरून घरी आल्या, तेव्हा स्वप्नीलच्या मित्रांनी ही घटना त्याच्या आईला सांगितली. तेव्हा त्याच्या आईला हे ऐकून विश्वासच बसत नव्हता. त्याच्या आईने स्वप्नीलला कुशीत घेत आनंदाश्रू ओंझाळत देवाचे आभार मानले.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.