लातुरात छेड काढणाऱ्या तरुणाची हत्या

लातूर : मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना घडली. लातूर जिल्ह्यातील तळणी-मोहगाव या गावात ही घटना घडली. हत्ये अगोदर मुलीच्या नातेवाईकांनी छेड काढल्या प्रकरणी मृत तरुणावर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. रेणापूर जवळच्या तळणी-मोहगाव इथे मुलीला छेडल्याच्या कारणावरून मुलीचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले. गावातील तरुण सागर मोमले हा …

लातुरात छेड काढणाऱ्या तरुणाची हत्या

लातूर : मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना घडली. लातूर जिल्ह्यातील तळणी-मोहगाव या गावात ही घटना घडली. हत्ये अगोदर मुलीच्या नातेवाईकांनी छेड काढल्या प्रकरणी मृत तरुणावर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

रेणापूर जवळच्या तळणी-मोहगाव इथे मुलीला छेडल्याच्या कारणावरून मुलीचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले. गावातील तरुण सागर मोमले हा मुलीची छेड काढत तिचा मोबाईल नंबर मागत होता. तो नेहमीच तिला त्रास देत असल्याची तक्रार मुलीने आपल्या घरच्यांकडे केली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी सागर विरोधात चाकूर पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंदही करून घेतली. मात्र हा वाद वाढत गेला.

शुक्रवारी सायंकाळी मुलीचे नातेवाईक आणि इतर आठ-दहा जणांनी मिळून सागर मोमले याला बेदम मारहाण केली. गावातल्या शाळेजवळ सागरला गाठून लाठ्या-काठ्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सागर गंभीर जखमी झाला. त्यानंतर सागरला लगेच लातूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सागरच्या हत्ये प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *