LIVE : प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट पाठोपाठ बीएमसी कर्मचारी संघटनेचाही संपाचा इशारा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

LIVE : प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट पाठोपाठ बीएमसी कर्मचारी संघटनेचाही संपाचा इशारा
Picture

प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट पाठोपाठ बीएमसी कर्मचारी संघटनेचाही संपाचा इशारा

मुंबई : बेस्ट पाठोपाठ बीएमसी कर्मचारी संघटनेचाही संपाचा इशारा, मुंबई महापालिकेच्या विविध विभागाच्या कामगांरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत 27 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या, अन्यथा कर्मचारी संघटना संप पुकारणार

26/08/2019,4:34PM
Picture

राष्ट्रवादीचे बीडचे जिल्हाध्यक्ष चंपावती पानसंबळ यांचा भाजपमध्ये प्रवेश

बीड : राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, जिल्हाध्यक्ष चंपावती पानसंबळ यांचा भाजपमध्ये प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित प्रवेश


26/08/2019,4:24PM
Picture

बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा

बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा, 28 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार

26/08/2019,11:34AM
Picture

सोलापूर : फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट

सोलापूर : मंगळवेढ्यातील फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, भाळवणी येथील सागर फायर वर्क्स या फॅक्टरीत स्फोट, स्फोटात सर्व फटाके जळून खाक

26/08/2019,11:17AM
Picture

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगरला पारनेर तालुक्यातील गुणोरे गावात चौघांची आत्महत्या,  एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने खळबळ, बढे कुटुंबातील आई वडिलांसह दोन मुलांनी केली आत्महत्या, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार घटनास्थळी दाखल

26/08/2019,11:14AM
Picture

औरंगाबाद शहरात सोनसाखळी चोरांचा हैदोस

औरंगाबाद शहरात सोनसाखळी चोरांची चांगलीच हिंमत वाढलेली दिसतेय, दुचाकीवरून आलेल्या दोन सोनसाखळी चोरांनी दुचाकीवरून जात असलेल्या एक महिलेला रस्त्यातच अडवून तिची सोनसाखळी हिसकावली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली असून cctv चं एक्सक्लुझिव फुटेज tv9 मराठीच्या हाती लागलं आहे. या फुटेज मध्ये दोन चोरटे अत्यंत धाडसाने या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जाताना दिसत आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

26/08/2019,11:13AM
Picture

नाशिकच्या मुथुट फायनानान्स प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

नाशिकच्या मुथुट फायनानान्स प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 11 आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई, या आरोपींना 14 जून रोजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मुथुट फायनान्सवर भर दिवसा दरोडा टाकला होता, यात झालेल्या गोळीबारात सॅज्यू सॅम्युल या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, ही दरोडा टाकणारी टोळी देशभरात रेकी करत होती, यांच्यावर अनेक मोठे गुन्ह्यांचीही नोंद

26/08/2019,11:09AM
Picture

पुणे जिल्ह्यातील 130 गावात दूषित पाणी

पुणे जिल्ह्यातील 130 गावात दूषित पाणी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून धक्कादायक चित्र समोर, 13 गावांमधील पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण 20 टक्क्यांहून कमी, खेड तालुक्यातील सर्वाधिक 18 गावांत तर वेल्हे सर्वात कमी तीन गावांत दूषित पाणी, जिल्ह्यात 2918 पाण्याचे नमुने तपासले असता, त्यातील 259 नमुने दूषित, पावसामुळे दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याची प्रशासनाची माहिती

26/08/2019,11:05AM
Picture

वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून पाऊसाची रिपरिप

वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून पाऊसाची रिपरिप, सर्व भागात पाऊस, हिंगणघाट तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच दार 45 सेमीने उघडले, नदीकाठावरील मंगरूळ, कोरा, आसोला गावाला सतर्कतेचा इशारा

26/08/2019,11:02AM
Picture

राज्यातील 76 साखर कारखान्यांनी FRP न दिल्याने ऊस उत्पादकांचे 405 कोटी रुपये थकीत

राज्यातील 76 साखर कारखान्यांनी FRP न दिल्याने ऊस उत्पादकांचे 405 कोटी रुपये थकीत

26/08/2019,11:00AM
Picture

मुंबई : मलबार टेकडीवर उभारण्यात आलेल्या प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीसाठी शुल्क आकारण्यात येणार

मुंबई : मलबार टेकडीवर उभारण्यात आलेल्या प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीसाठी शुल्क आकारण्यात येणार, गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्याचे या प्रेक्षक गॅलरीचे लोकार्पण झाल्यानंतर या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. 16 वर्षांपुढील सर्वांनाच 20 रुपये तर परदेशी पर्यटकांना 50 रुपये शुल्क आकारणी, मात्र त्याखाली मुलांना नि:शुल्क प्रवेश दिला जाणार, या गॅलरीतून मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद लुटता येणार

26/08/2019,10:51AM
Picture

नंदुरबार:-मुलीची छेडछाड केल्याच्या संशयातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक

नंदुरबार:-मुलीची छेडछाड केल्याच्या संशयातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत काही प्रवासी आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, रात्री 12 ते 1 वाजेदरम्यानची घटना, रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात

26/08/2019,10:48AM
Picture

नागपूरकरांवरचं जलसंकट दूर होणार

नागपूरकरांवरचं जलसंकट दूर होणार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात चौराई धरणाचे पाणी येणार, मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे सहा दरवाजे उघडले, संध्याकाळपर्यंत 80 ते 85 दशलक्ष घनमीटर पाणी तोतलाडोह धरणात येणार, नागपूरकरांना दिलासा, धरणात पाणी नसल्याने सध्या नागपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा

26/08/2019,10:44AM
Picture

नागपूर : ऋषी खोसला हत्याकांडात एकूण 6 आरोपी अटकेत

नागपूर : परिसरातील ऋषी खोसला हत्याकांडात चार आरोपींना अटक, तर यापूर्वी 2 आरोपींना अटक, ऋषी खोसला हत्याकांडात एकूण 6 आरोपी अटकेत, 22 ऑगस्टला व्यावसायिक ऋषी खोसला यांची हत्या झाली होती, आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय, याप्रकरणी मिक्की बक्षी आणि एका आरोपीला आधीच अटक करण्यात आली होती, आता आणखी 4 जणांना अटक झाली.

26/08/2019,10:42AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *