Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दिवसभरात सर्वाधिक 97 कोरोनाबळी

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दिवसभरात सर्वाधिक 97 कोरोनाबळी
Picture

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार 758 वर

26/05/2020,8:36PM
Picture

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजार वर

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजार वर, आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी 54 टक्के रुग्ण ठणठणीत बरे, तर 42 टक्के रुग्णांवर उपचार सुरु, पुण्यातील मृत्यू दर सर्वाधिक 6 टक्के, पुण्यातील वाढता मृत्यू दर ही गंभीर बाब, मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला अपयश, पुण्यातील एकूण कोरोना रुग्ण 5 हजार 181, आतपर्यंत 264 रुग्णांचा मृत्यू

26/05/2020,11:19AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात 22 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 22 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1327 कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्राशसनाने दिली.

26/05/2020,11:09AM
Picture

सोलापुरात कोरोनाचे 13 नवे रुग्ण

सोलापुरात आज कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये नऊ पुरुष आणि चार स्त्रियांचा समावेश आहे. आता सोलापुरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 621 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

26/05/2020,11:05AM
Picture

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे घरात बसून आंदोलन

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आज घरात बसून आंदोलन, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न न सोडविल्याबद्दल सरकारच्या निषेधार्थ आंदोलन, अनुदान घोषित करण्याबाबत तात्काळ आदेश काढावेत, शिक्षकांना 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान देण्यात यावे, शिक्षकांना दारू दुकानावर काम देण्याऐवजी, जनजागृतीची कामं द्यावीत आदी मागण्या शिक्षकांकडून करण्यात येत आहेत, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

26/05/2020,10:52AM
Picture

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 984 वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 984 वर, जिल्ह्यात गेल्या 24 तासात 21 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, जिल्ह्यतील कोरोना बळींची संख्या 52, यामध्ये मालेगाव 45, नाशिक शहरातील 5, ग्रामीण 1 तर जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश, मालेगावमध्ये एकूण 716 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आतापर्यंत 728 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर जिल्ह्यात 256 रुग्णांवर उपचार सुरू

26/05/2020,10:45AM
Picture

पुण्यात बारा तासात दोन हत्या

पुण्यात बारा तासात दोन हत्या करण्यात आल्या आहेत. या घटना येरवडा आणि हडपसर परिसरात घडल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुण्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. बारा तासात पुणे शहरात दोन हत्या घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हनुमंत वन्नाळे (28) आणि बलभिम कांबळे अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत.

26/05/2020,10:37AM
Picture

हो, 'मातोश्री'वर पवार-ठाकरेंची दीड तास चर्चा, पण... : संजय राऊत

26/05/2020,10:32AM
Picture

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार?

26/05/2020,10:31AM
Picture

नाग अंगावर सोडून पत्नीची थंड डोक्याने हत्या, वीस दिवसांनी गूढ उकललं

26/05/2020,10:30AM
Picture

वसई, विरार, नालासोपाऱ्यात एकाच दिवसात 62 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

वसई, विरार, नालासोपाऱ्यात काल एकाच दिवसात 62 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर एकाचा मृत्यू, काल एकूण 5 रुग्ण कोरोनामुक्त, नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका गरोदर मातेसह महापालिकेच्या आरोग्य विभागातील सुरक्षारक्षक, वार्डबॉय, नर्सिंग, परिचारिका अशा 7 जणांचा समावेश, तर 29 जण हायरिस्कमधील रुग्ण

26/05/2020,10:23AM
Picture

पुणे जिल्ह्यात बारा तासात 44 नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात 12 तासात 44 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 6197 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

26/05/2020,10:15AM
Picture

पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची अधिक कडक अंमलबजावणी होणार

पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची अधिक कडक अंमलवजाबणी होणार. प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनारूग्ण संख्या कमी होत नसल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला. प्रतिबंधित क्षेत्र पत्र्यांनी बंद केले असतांनाही नागरिक रस्ता काढून ये-जा करत आहेत. पत्र्याच्या फटीतून ये-जा करणाऱ्यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना घरपोच शिधा वाटप. शिवाय जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप घरपोच केले जाणार आहे.

26/05/2020,10:06AM
Picture

पुण्यात पोलिसांसाठी कोरोना मदत कक्ष

पुण्यात पोलिसांसाठी आता कोरोना मदत कक्ष उभारण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयात तसेच शहर पोलीस आयुक्त कार्यालयात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. या परिस्थितीत पोलीस तसेच त्यांच्या कुटूंबियांना तात्काळ मदत मिळावी म्हणून कक्षाची स्थापना केली आहे. पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांची या कक्षाचे समनव्यय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यात एकूण 22 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 10 जणांना डीचार्ज देण्यात आला आहे.

26/05/2020,9:59AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

26/05/2020,9:54AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *