Live Update : सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण

Live Update : सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण
Picture

सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण

सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू, आज आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 5 पुरुष तर 4 स्त्री रुग्णांचा समावेश, आता सोलापुरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 860 वर, तर आतापर्यंत कोरोनामुळे 78 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात 351 जण कोरोनातून मुक्त

30/05/2020,11:32AM
Picture

बारा तासात पुणे जिल्ह्यात 55 नवे कोरोना रुग्ण

बारा तासात पुणे जिल्ह्यात 55 नवे कोरोना रुग्ण, तर जिल्ह्यात आत्तापर्यंत 321 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 7369 वर

30/05/2020,11:28AM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या मानधनात कपात करण्याची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या मानधनात कपात करण्याची मागणी, शिवसेनेची निवेदनाद्वारे पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे मागणी, आयुक्तांनी सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, शिवाय 800 चौरस फुटांच्या घराची मिळकतकर माफी देण्याची मागणी, लॉकडाऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नात घट झाली,

30/05/2020,11:26AM
Picture

वर्धा जिल्ह्यात एका महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

वर्धा जिल्ह्यात एका महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, अकोला येथून आर्वी येथे माहेरी आलेल्या महिलेचा दोन दिवसांपूर्वी अहवाल पॉझिटिव्ह, आज तिच्या एका महिन्याच्या चिमुकल्यालाही कोरोनाची लागण, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला 20 वर,

30/05/2020,11:15AM
Picture

नागपुरात आणखी एक कोरोना बळी

नागपुरात आणखी एक कोरोना बळी, सीए रोडवरील भिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, नागपुरात कोरोनाबळींची संख्या पोहोचली 10 वर, नागपूर शहरात आतापर्यंत 501 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद, आतापर्यंत 370 रुग्णांनी केली कोरोनावर मात

30/05/2020,11:12AM
Picture

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पाच दिवसांत कारागृहात शरण येण्याचे आदेश

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पाच दिवसांत नागपूर कारागृहात शरण येण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आदेश, अरुण गवळीला पॅरोल रजा वाढवून मिळणार नसल्याचंही न्यायालयाने केलं स्टष्ट, पॅरोल रजा आणखी वाढवून देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

30/05/2020,11:09AM
Picture

नाशिक शहरात एक दिवस दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

नाशिक शहरात एक दिवस दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा बंद नाशिक शहरात आज दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा असणार बंद, वॉटर पम्पिंग स्टेशन दुरुस्ती तसेच महावितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी होणारी वीज लाईनची दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, उद्या ही सकाळच्या सुमारास नाशिक शहरात कमी दाबाच्या पट्ट्याने पाणी पुरवठा, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती

30/05/2020,11:04AM
Picture

पुण्यातील नवले हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पुण्यातील नवले हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, डिसेंबर महिन्यापासून पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शिवाय लॉकडाऊनमध्ये कामावर न आल्यामुळे 219 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले, नवले हॉस्पिटलमध्ये सध्या 80 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

30/05/2020,10:39AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

30/05/2020,10:35AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *