Live Update : तीन दिवसांपासून नागपुरातील 'एम्स' ची लॅब बंद

Live Update : तीन दिवसांपासून नागपुरातील 'एम्स' ची लॅब बंद
Picture

तीन दिवसांपासून नागपुरातील 'एम्स' ची लॅब बंद

तीन दिवसांपासून नागपुरातील ‘एम्स’ ची लॅब बंद, एम्समधील प्रयोगशाळेतील तीन डॉक्टर, चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह, डॉक्टर आणि तंत्रज्ञ कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लॅब बंद, एम्समध्ये कोरोना चाचण्या बंद असल्याने इतर लॅबवरचा भार वाढला, एम्सच्या प्रयोगशाळेत रोज 250 नमुने तपासले जात होते, लॅब बंद असल्याने नमुने तपासणीस विलंब

04/09/2020,11:02AM
Picture

04/09/2020,10:59AM
Picture

आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित

04/09/2020,10:59AM
Picture

बदल्या तर होणारच, सामना अग्रलेखातून विरोधकांच्या टीकेचा समाचार

04/09/2020,10:58AM
Picture

'पहले मंदिर फिर सरकार' म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा

04/09/2020,10:57AM
Picture

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 September 2020

04/09/2020,10:56AM
Picture

टॉप 9 न्यूज | 4 September 2020

04/09/2020,10:55AM
Picture

सॅम्युअल मिरांडा NCB च्या ताब्यात, रिया-शोविकच्या घराची झाडाझडती

04/09/2020,10:54AM
Picture

रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकही NCB च्या ताब्यात

04/09/2020,10:54AM
Picture

रेमेडेसिवीर इंजेक्शन कोल्हापुरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपलब्ध होणार

रेमेडेसिवीर इंजेक्शन कोल्हापुरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपलब्ध होणार, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश, इंजेक्शन खरेदीसाठी गर्दी होत असल्याने जिल्हा परिषदेतून होणार पुरवठा थांबवला, जिल्ह्यातील सरकारी रुग्णलया बरोबरच 9 खाजगी रुग्णालयात मिळणार रेमडीसिवीर, नियंत्रणाची जबाबदारी अन्न औषध प्रशासन विभागाकडे

04/09/2020,10:50AM
Picture

औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली

औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली, निखिल गुप्ता हे औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद हे आज सोडणार पदभार, निखिल गुप्ता हे स्वीकारणार आयुक्त पदाची सूत्रे

04/09/2020,10:42AM
Picture

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हाट्सअॅप ग्रुपचा पुढाकार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हाट्सअॅप ग्रुपचा पुढाकार, कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या वृद्धावर अकरा तासानंतर अंत्यसंस्कार, कोल्हापूर मीडिया व्हाट्सअॅप ग्रुपच्या प्रयत्नानंतर अंत्यसंस्कारासाठी बैतुलमाल कमिटी धावली, वृद्धासोबत राहत असलेली त्यांची पत्नी देखील आढळली कोरोनाबाधित, वृध्द महिलेला उपचारासाठी केलं दाखल

04/09/2020,10:36AM
Picture

औरंगाबादमधील जायकवाडी धरण 97 टक्के भरलं

औरंगाबादमधील जायकवाडी धरण 97 टक्के भरलं, जायकवाडी धरणात 11 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु, तर उजव्या कालव्यातून 200 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू, जायकवाडी धरण भरल्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला दिलासा, शेतीसह औद्योगिक वसहतीलाही मिळाली संजीवनी

04/09/2020,10:21AM
Picture

पुण्यात कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधींसाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ

पुण्यात कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधींसाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ, रुग्णालयांनुसार स्मशानभूमीची व्यवस्था, प्रत्येक स्मशानभूमीसाठी शववाहिकाही तैनात, यापूर्वी कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतच केले जात होते कोरोनाबाधित मृतांचे अंत्यसंस्कार, यापुढे या दोन स्मशानभूमींसह औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी स्मशानभूमीमध्येही अंत्यसंस्कार केले जाणार

04/09/2020,10:17AM
Picture

नागपूर जिल्ह्यात मोसंबी उत्पादकांवर मोठं संकट

नागपूर जिल्ह्यात मोसंबी उत्पादकांवर मोठं संकट, काढणीला आलेली मोसंबी गळायला लागली, मोसंबीची गळ वाढल्याने शेतकरी संकटात, प्रशासनानं तात्काळ सर्व्हे करण्याची शेतकऱ्यांची मागणी, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी

04/09/2020,10:13AM
Picture

देशात कोरोना संक्रमणाची संख्या 39 लाख 36 हजार 747 वर पोहोचली

देशात कोरोना संक्रमणाची संख्या 39 लाख 36 हजार 747 वर पोहोचली, तर आतापर्यंत 68 हजार 472 मृत्यू, गेल्या 24 तासात देशात 84 हजार 341 कोरोना रुग्ण, तर 1 हजार 96 मृत्यू

04/09/2020,10:10AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

04/09/2020,10:08AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *