LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

09/12/2019,1:39PM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

दशरथ दादा चहावाला, देवेंद्र फडणवीसांचा नीरा नरसिंहपूरचा अनोखा मित्र!

09/12/2019,11:40AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

Karnataka bypoll results Live : कर्नाटक पोटनिवडणूक निकाल - भाजप 15 पैकी 12 जागांवर आघाडीवर

09/12/2019,11:40AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

लग्नमंडपात फडणवीसांशी काय चर्चा झाली, माढ्यातील प्रश्नाचं उत्तर अजित पवारांनी बारामतीत दिलं!

09/12/2019,11:39AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

हैदराबाद एन्काऊंटरची SIT चौकशी, 8 जणांच्या टीमचं नेतृत्व मराठी आयपीएस अधिकाऱ्याकडे

09/12/2019,11:41AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

मी उपमुख्यमंत्री व्हावं असं कार्यकर्त्यांना वाटतं : अजित पवार

09/12/2019,10:24AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बसचा अपघात

रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बसचा अपघात, बसमधील 43 प्रवासी सुखरुप, चालक वाहकही सुरक्षित, बेशिस्त चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने आरामबसच्या चालक कॅबिनचे नुकसान, लातूरहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात खोपोली एक्झीटजवळ पहाटेच्या सुमारास अपघात

09/12/2019,8:17AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांचं आज खातेवाटप होण्याची शक्यता

09/12/2019,8:16AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी, कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघात 165 जण रिंगणात, 15 पैकी 8 मतदारसंघात भाजपला विजय आवश्यक, भाजपने निवडणुकीत 8 जागा गमावल्यास काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करू शकणार

09/12/2019,7:57AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

बीडमध्ये ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बीडमध्ये ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पिंपळनेर पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी ज्ञानेश्वर मोमीनसह अन्य एक जण फरार, भरदिवसा झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे पीडित कुटुंब भयभीत

09/12/2019,7:53AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

केंद्र सरकारच्या एनआरसी कायद्यातील नव्या तरतुदींविरोधात विरोधक एकटवले

केंद्र सरकार आज एनआरसी कायद्याच्या नव्या तरतुदी लोकसभेत मांडणार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष विरोधात, विरोधी पक्षांकडून आपल्या खासदारांना व्हिप जारी, भाजपाने देखील 9 ते 11 दरम्यान प्रत्येक खासदाराला लोकसभेत हजर राहण्यासाठी व्हिप

09/12/2019,7:50AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल फोन आढळल्याने कारभार चव्हाट्यावर

कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर, कारागृहातील शौचालयाच्या ड्रेनेजजवळ मोबाईल सापडल्याने खळबळ, कारागृहाच्या झाडाझडती दरम्यान मोबाईल सापडला, अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या संशयितांची बडदास्त राखल्या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली

09/12/2019,7:47AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सचिवालयाचे कामकाज आजपासून सुरु होणार

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सचिवालयाचे कामकाज आजपासून सुरु होणार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेचे सभापती तयारीचा आढावा घेणार, साडेअकरा वाजता विधानसभा अध्यक्षांकडून तयारीचा आढावा, हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण

09/12/2019,7:45AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

औरंगाबादेत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

औरंगाबादेत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॉलच्या व्यवस्थापकासह दोन दलाल, दोन आन्टी आणि चार ग्राहकाना अटक, चार तरुणींची मुक्तता, बीड बायपास परिसरातील राजेश नगर आणि सातारा परिसरातील यशवंतनगर परिसरातील घटना, दलाल संजय त्र्यंबक कापसे , दलाल विनोद टेकचंद नागवणे , ग्राहक म्हणून गेलेला मॉलचा व्यवस्थापक महंमद अर्षद माजिद अली, अमोल दामू शेजुळ, ज्ञानेश्वर सर्जेराव जऱ्हाड, अजय सुभाष साळवे यांच्यासह दोन आन्टी पोलिसांच्या ताब्यात

09/12/2019,7:40AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

नागपुरात शरीरसुखाची मागणी करत समलैंगिकावर टोळक्याचा हल्ला

नागपुरात शरीरसुखाची मागणी करत समलैंगिकावर सात ते आठ जणांचा हल्ला, नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत कडबी चौकातील घटना, हल्ला झालेला समलैंगिक तरुण एलजीबीटी ॲक्टीविस्ट, पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

09/12/2019,7:37AM
Breaking News, LIVE: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यासाठी 293 खासदारांचा पाठिंबा

मानखुर्दमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

मानखुर्दमधील आगीवर नियंत्रण, 4 फायर ब्रिगेड गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात, आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही

09/12/2019,7:36AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *