बुलडाण्यातील लग्नाची प्रेरणादायी गोष्ट, तरुणीच्या धाडसाला घरच्यांची साथ, एक हात तुटलेल्या युवकासोबत विवाह

बुलडाण्यातील चिखलीमध्ये एका अनोख्या विवाहाची चर्चा आहे. एका मुलीने हात तुटलेल्या तरुणासोबत लग्न केले. Vishal Ingale Priya Ghevande

बुलडाण्यातील लग्नाची प्रेरणादायी गोष्ट, तरुणीच्या धाडसाला घरच्यांची साथ, एक हात तुटलेल्या युवकासोबत विवाह
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 5:50 PM

बुलडाणा: चिखली तालुक्यात सध्या एका अनोख्या विवाहाची चर्चा आहे. एका मुलीने हात तुटलेल्या एका तरुणासोबत लग्न केले. आश्‍चर्यचकीत होण्यासारखी गोष्ट तुम्हाला वाटली असेल. पण, यात आश्‍चर्य वाटण्यासारखे तिला काहीच वाटत नाही. कारणही तेवढेच विशेष आहे. त्यामुळे तुम्ही याला वाहऽऽ म्हणाल, धाडसी मुलगी अन् प्रेम!! विवाह या हिंदी चित्रपटाचे कथानकच जणू या ठिकाणी जसेच्या तसे उतरले आहे. फरक इतकाच की तिथे नायकाने धाडस केले आणि इथे या खर्‍याखुर्‍या नायिकेने… (Buladana ideal marriage story of Vishal Ingale and Priya Ghevande)

बुलडाणा जिल्ह्याच्या चांधई येथील विशाल दिनकर इंगळे आणि मंगरूळ नवघरे येथील प्रिया अंकुश घेवंदे यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. नव्या वैवाहिक आयुष्याची, संसार फुलविण्याची स्वप्नं दोघांनीही बघायला सुरुवात केली. विशाल ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. सगळीकडे आनंदीआनंद, दोन्ही कुटुंबाची लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, बहुधा हा आनंद नियतीला बघवला गेला नसावा. लग्न ठरल्यानंतर एकाच महिन्यात विशाल यांचा देऊळगाव महीजवळ भीषण अपघात झाला.

अपघातात हात गमावला

विशाल इंगळेचा अपघातात डावा हात ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्याच्यावर औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, पूर्णतः निकामी झाल्याने डावा हात कापावा लागला. वाहनचालक असल्याने ज्या हातांवर पोट होते, तोच हात राहिला नसल्याने आता पुढे काय?, असा प्रश्‍न निर्माण झाला. (Buladana ideal marriage story of Vishal Ingale and Priya Ghevande)

आता कमाईचाच प्रश्‍न निर्माण झाला म्हटल्यावर लग्न तर मोडल्यातच जमा होते. मात्र, याच काळात वेगळीच कथा जन्म घेत होती. प्रियाला विशालची ओढ लागली होती. तो उपचार घेऊन बरा होऊन येईल, आमचे लग्न होईल, अशी स्वप्ने ती रंगवत होती. रोज विशालला फोन करून तब्येची विचारपूस करायची. मात्र, हातच निकामी झाल्यामुळे विशालने काळजावर दगड ठेवून तिला सत्य परिस्थिती सांगितली.

विशालला आता वाहन चालवता येणार नसल्यामुळे प्रियाच्या घरूनही या विवाहाला विरोध सुरू झाला. मात्र, दुसरीकडे प्रियाने विशालला कायमचे स्वीकारले होते. आम्ही तीन हातांनी संसार उभा करू, असे म्हणत प्रियानं घरच्यांना समजावून सांगितले अन् तिच्या या निर्णयापुढे आई- वडिलांनाही नमते घ्यावे लागले.दोन्ही घरच्यांनी पुढाकार घेऊन दोघांचा 27 नोव्हेंबरला मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत चांधई येथे हा विवाह लावून दिला. या विवाहाची चर्चा कानावर येताच सारेच थक्क आहेत आणि प्रियाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. थोड्याशा स्वार्थापोटी प्रेम अन् कर्तव्य विसरून जाणार्‍या तरुणाईपुढे प्रिया आणि विशाल यांनी जणू आदर्शच ठेवला आहे. (Buladana ideal marriage story of Vishal Ingale and Priya Ghevande)

संंबंधित बातम्या:

Kartiki Gaikwad | लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ‘लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाड थेट ‘वर्षा’वर!

मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त 80 आर, बायकोचे दागिने गहाण, कर्ज कसं फेडू?, फडणवीसांसमोर बळीराजाचा टाहो

(Buladana ideal marriage story of Vishal Ingale and Priya Ghevande)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.