बुलडाण्यात चिमुरड्या विद्यार्थ्यांकडून गटाराची सफाई, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून गटार आणि नाले साफ (Student cleaning gutter buldana) करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Student cleaning gutter buldana, बुलडाण्यात चिमुरड्या विद्यार्थ्यांकडून गटाराची सफाई, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

बुलडाणा : खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून गटार आणि नाले साफ (Student cleaning gutter buldana) करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. याप्रकरणी शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून लवकरच कारवाई करु (Student cleaning gutter buldana) असं आश्वासन दिले.

ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक सवलती आणि योजना राबविण्यात येतात. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाऐवजी शिक्षकांकडून इयत्ता 1 ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून संपूर्ण गावातील घाण कचरा आणि गटार साफ करवून घेतले. विशेष म्हणजे यावेळी शाळेतील शिक्षक बाजूला उभे राहून हे सर्व बघत होते.

गटार साफ करणाऱ्या सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना काल सकाळची शाळा होती. मात्र शाळेत शिक्षणाऐवजी चिमुकल्या हाताकडून गटारे साफ करून घेतले गेले. हा प्रकार येथील काही नागरिकांनी कॅमेरात कैद करून गावातीलच व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल केला. यामुळे बघ्यांची भूमिका घेणाऱ्या शिक्षकांच्याविरोधात गावातून संतापाची लाट उसळली. याबाबत मुख्याध्यापक चांदणे मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर योग्य कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यांनीही हा गंभीर प्रकार असलयाचे कबूल केले आहे. शिवाय जे कोणी याप्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वसन दिले. यासर्व प्रकरणात मुख्याध्यापक दोषी आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *