भरधाव कंटनेरची टॅक्सीला धडक, पत्नी पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. (Buldhana Container taxi accident three People Died)

  • गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा
  • Published On - 16:50 PM, 25 Jan 2021
भरधाव कंटनेरची टॅक्सीला धडक, पत्नी पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

बुलडाणा : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने काळी पिवळी टॅक्सीला धडकेत झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. बुलडाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा-वडनेर मार्गावरील वडी गावाजवळ ही घटना घडली आहे. (Buldhana Container taxi accident three People Died)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त काळी-पिवळी प्रवाशी वाहतूक करणारी गाडी नांदुराकडून मलकापूरकडे जात होती. यावेळी वडनेरकडून नांदुराकडे भरधाव वेगाने येत असलेल्या कंटनेरने वडनेर गावाजवळ काळी पिवळी टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 9 जण गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघातात काळी पिवळी टॅक्सीत बसलेले प्रवाशी सुनिल सुभाष तायडे, अर्चना सुनिल तायडे या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यासोबतच भगीरथाबाई विठ्ठल दळवी राहणार वडनेर याचाही मृत्यू झाला.

या घटनेची महिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढला. पण नागरिक आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे नांदुरा शहरात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी कंटेनर चालक जीवन नलबतसिंग मालवी, मध्यप्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करत नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे. (Buldhana Container taxi accident three People Died)


संबंधित बातम्या : 

मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, दहा वर्षांच्या भाच्याची हत्या

अ‌ॅमेझॉन वरुन मागवले कलर प्रिंटर, घरातच बनवत होता बनावट नोटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या