बसस्थानकात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

बुलडाणा : बसस्थानकात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलाला बेदम मारहाण झाली आहे. बुलडाण्यातील नांदुरा इथं ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या कुटुंबीयांनीच ही मारहाण केली. खोट्या सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी नांदुरा बस स्थानकात घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाण झाली असली, तरी या घटनेची पोलिसात …

बसस्थानकात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

बुलडाणा : बसस्थानकात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलाला बेदम मारहाण झाली आहे. बुलडाण्यातील नांदुरा इथं ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या कुटुंबीयांनीच ही मारहाण केली. खोट्या सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.

मंगळवारी नांदुरा बस स्थानकात घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाण झाली असली, तरी या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनीही काहीही कारवाई केलेली नाही.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अप-डाऊन करतात. यातील एक विद्यार्थिनी मंगळवारी दुपारी आपल्या प्रियकरासोबत नांदुरा येथीलच बस स्थानकावर गप्पा मारत होती. याची माहिती तिच्या कुटुंबातील सदस्यांना मिळाली. चिडलेल्या कुटुंबीयांनी बस स्थानक गाठून दोघांना गप्पा मारताना रंगेहाथ पकडले आणि तिथेच त्यांना बेदम मारहाण केली.

मुलीसह तिच्यासोबत बोलत नसलेल्या दुसऱ्या युवकालाही बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर मुलीकडील मंडळी तिला घेऊन निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ उपस्थित बघ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलमध्ये फॉरवर्ड झाला.

याप्रकरणी नांदुरा पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याची चर्चा नांदुरा शहरात होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *