Buldana Lotus | बुलडाण्यात खडकाळ जमिनीवर फुलविले कमळ, अवघ्या 10 गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न; सोशल मीडियातून रोपांची विक्री

Buldana Lotus | बुलडाण्यात खडकाळ जमिनीवर फुलविले कमळ, अवघ्या 10 गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न; सोशल मीडियातून रोपांची विक्री
बुलडाण्यात खडकाळ जमिनीवर फुलविले कमळ
Image Credit source: tv 9

कमळ शेती करायला सुरुवात केलीय. कमळ शेतीचे कमलेशला थोडेफार ज्ञान होतेच. मात्र कमलेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे ज्ञान वाढविले. आज त्यांच्याकडे कमळाच्या शेकडो जाती आहेत.

गणेश सोळंकी

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 14, 2022 | 5:29 AM

बुलडाणा : कमळ चिखलातच नव्हे तर खडकाळ जमिनीवर देखील फुलते. याचा प्रत्यय बुलडाणा येथील कमलेश देशमुख (Kamlesh Deshmukh) आणि शेलगाव जहागीर (Shelgaon Jahagir) येथील भागवत ठेंग (Bhagwat Theng) या नात्याने साले-मेव्हणे असलेल्या जोडीने कमळाची बाग फुलवून दिलाय. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेल्या कमलेशने आपल्याकडे शेती नसतानाही साल्याला सोबत घेत त्याच्याच अवघ्या दहा गुंठे खडकाळ शेतात कमळ शेती करायला सुरुवात केलीय. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला. त्यात बुलडाणामधील कमलेश देशमुख यांची सुद्धा नोकरी गेलीय. मात्र ध्येयवेड्या कमलेशला झाडांची, फुलांची आवड आहे. सुरुवातीला आपल्या घराच्या छतावर परसबाग तयार करून कमळ शेती केलीय. मात्र व्यवसाय वाढत असल्याने आणि कमलेशकडे शेती नसल्याने कमलेशने आपल्या साल्याला विनंती केली. त्याला सोबत घेत खडकाळ जमिनीमधील दहा गुंठे शेत सपाटीकरण केले.

सोशल मीडियाचा वापर

कमळ शेती करायला सुरुवात केलीय. कमळ शेतीचे कमलेशला थोडेफार ज्ञान होतेच. मात्र कमलेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे ज्ञान वाढविले. आज त्यांच्याकडे कमळाच्या शेकडो जाती आहेत. ज्या खडकाळ जमिनीत काहीच उत्पन्न होत नव्हते. त्या ठिकाणी आज कमळ शेती तयार केलीय. त्याठिकाणी विविध जातीच्या कमळाची रोपे तयार केली जातात. त्याची विक्रीसुद्धा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात. आज रोजी कमलेश आणि भागवत ही साला-मेव्हण्याची जोडी या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे.

वॉटर लिलीची शेकडो जातीची रोपे

सोबत म्हणून असलेला कमलेश यांचा साला भागवत ठेंग हे सुद्धा रोपांना पाणी देणे, त्यांची काळजी घेणे सोबत इतरही कामात कमलेशची मदत करतात. आज रोजी कमलेश आणि भागवत या साल्या-मेव्हण्याची जोडी संपूर्ण भारतात कमळाची आणि वॉटर लिलीची शेकडो प्रकारच्या जातीची रोपे तयार करून विकतात. लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. खडकाळ जमिनीत काहीच येत नाही, म्हणणाऱ्यांनी या जोडीचा आदर्श घ्यावा…

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें