Video: बुलडाण्यात दरोडेखोरांचा धूमाकुळ, दुकान मालकाचा खून CCTV मध्ये कैद, तलवारीनं वार

जमिनीवर पडलेले कमलेश पोपट यांनी तशाच जखमी अवस्थेत आपल्या मोबाईल फोनद्वारे कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांन कळताच त्यानंतर लगेचच कमलेश पोपट यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Video: बुलडाण्यात दरोडेखोरांचा धूमाकुळ, दुकान मालकाचा खून CCTV मध्ये कैद, तलवारीनं वार
बुलडाण्यात इलेक्ट्रीक दुकानावर दरोडा, मालकाचा खून
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 8:50 AM

बुलडाणा जिल्ह्यात एक महत्वाचा तालुका आहे चिखली. त्याच शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर काल रात्री 9.45 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोघा दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट यांचा जागीच तडफडून मृत्यू झालाय. ही संपूर्ण घटना cctv मध्ये कैद झाली असून शहरात एकच खळबळ उडालीय. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तातडीने पोलीस तपास सुरू केलाय.

नेमकं काय घडलं? चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट हे रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाचे मुख्य शटर बंद करून आतमध्ये थांबले होते. परंतु, बाजूचे लहान शटर उघडे असतांना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यातील दोघे जण ग्राहक बनून दुकानात शिरताच त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने आणि तलवारीने हल्ला केला. या झटापटीत ते दरोडेखोर रोख रक्कम लुटून फरार झालेत. जमिनीवर पडलेले कमलेश पोपट यांनी तशाच जखमी अवस्थेत आपल्या मोबाईल फोनद्वारे कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांन कळताच त्यानंतर लगेचच कमलेश पोपट यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बुलडाण्यात गुन्हेगारी वाढली मागील काही दिवसात बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. घाटावरचा प्रभार खामगावचे एडिशनल एसपी श्रावण दत्त यांच्याकडे असताना मागील दहा दिवसापासून घाटा खाली आणि वर सुद्धा अवैध व्यवसायिकांनी आपली दुकाने गुंडाळून ठेवली होती. परंतु काल पासून सर्व अवैध धंदे पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था याकडे सुद्धा पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज निर्माण झाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसतेय.

हे सुद्धा वाचा:

Chanakya Niti | हातात पैसा टिकत नाही, देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचंय? , तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात करा

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभीमानी’ आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण

Birth Anniversary | दक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे ‘कादल मन्नान’, वाचा अभिनेते जेमिनी गणेशन यांच्याबद्दल…

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.