स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता!, बुटीबोरी नगरपरिषदेकडून 4 महिन्यांचा पगार थकीत

नागपूरच्या बुटीबोरी नगर परिषदेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा 4 महिन्यांचा पगार अजून मिळालेला नाही. त्यामुळे या स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत हे स्वच्छता कर्मचारी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता!, बुटीबोरी नगरपरिषदेकडून 4 महिन्यांचा पगार थकीत

नागपूर: कोरोनाच्या संकटात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही देशाची सेवा केली. पण नागपूरच्या बुटीबोरी नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. कारण बुटीबोरी नगर परिषदेकडून या स्वच्छता कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळं या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ( salary of clinging staff of butibori muncipal council’s worker is pending)

बुटीबोरी नगर परिषदेकडून निधी नसल्यानं या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पगार झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. रखडलेला पगार मिळावा यासाठी 125 घनकचरा कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. संतप्त घनकचार कर्मचाऱ्यांनी बुटीबोरी नगरपरिषदेवर धाव घेतली आणि आपला संताप व्यक्त केला. महिन्याला पाच-सहा हजार वेतन असणारे सव्वाशेच्या आसपास घनकचरा कर्मचारी बुटीबोरी नगरपरिषगेत काम करतात. पण नव्यानं स्थापन झालेल्या या बुटीबोरी नगर परिषदेची तिजोरी रिकामी आहे.  त्यामुळे घनकचरा कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपच्या काळात बुटीबोरी नगरपरिषद स्थापन झाली. या नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार या नगरपरिषदेला निधी देत नाही, असा आरोप बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी केलाय. त्यामुळं घनकचरा कर्मचाऱ्यांचा 4 महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळं या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी या कर्मचाऱ्यांनी आता पगारासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोना, लॉकडाऊन आणि पगाराचे वांदे

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खासगी उद्योगांसह अनेक सरकारी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. खासगी कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात केली आहे. दुसरीकडे सरकारचे एसटी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, अशा अनेकांचे पगार थकलेले आहेत. आता दिवाळी तोंडावर आल्यानं सरकारने थकलेला सर्व पगार द्यावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार थकला; दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा

एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित नाही, अनिल परब यांचे स्पष्टीकरण

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं, निरंजन डावखरेंची अनिल परब यांच्यावर टीका

salary of clinging staff of butibori muncipal council’s worker is pending

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *