तुम्हाला इंजेक्शन हवंय, बेड हवाय, काहीही गरज असेल तर या नंबरवर फोन करा !

ठाण्याचे शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय कक्षाची निर्मिती करण्यात आलीय. help MP Shrikant Shinde Foundation

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:46 PM, 10 Apr 2021
तुम्हाला इंजेक्शन हवंय, बेड हवाय, काहीही गरज असेल तर या नंबरवर फोन करा !
shortage corona drug remedicivir

ठाणेः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. कोरोनावर प्रभावी असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचाही तुटवडा असल्याचं चित्र समोर आलंय. अनेक मेडिकलच्या बाहेर या इंजेक्शनसाठी मोठ मोठ्या रांगा असल्याचंही पाहायला मिळालंय. कोरोना रुग्णांना तात्काळ मदत मिळावी यासाठी शिवसेनेनंही वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केलाय. ठाण्याचे शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय कक्षाची निर्मिती करण्यात आलीय. (Call this number if you need an injection, bed, anything help MP Shrikant Shinde’s Foundation in thane)

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून कोरोना मदत कार्य

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून कोरोना मदत कार्य करत आहे. गरजूंनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केलंय. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, शहर, गाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय, कोरोना रुग्णासाठी शासकीय क्वारंटाईन सेंटर, रुग्णालय, रुग्णालयात पेशंट बेड, व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन, रक्त (प्लाझ्मा) कोरोना औषध पुरवठा ठिकाण, शासकीय आणि खासगी योजनेची माहिती, कोरोना आजारावरील आर्थिक साह्याची माहिती आणि मार्गदर्शन याबद्दल इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. या बाबींची अनेक रुग्णांना माहिती नसल्याकारणाने महाराष्ट्र रुग्णसेवा हे कर्तव्य समजून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून कोरोना मदत कार्य करत आहे.

ऑफिस कामकाजासाठी संपर्क साधावा

रोहित वायभासे (वैद्यकीय सहाय्यक) मोबाईल नंबर 8907776009

कोरोना तपासणीसाठी संपर्क साधावा

ऋषिकेश देशमुख (वैद्यकीय सहाय्यक) मोबाईल नंबर 8907776012

कोरोनाचे इंजेक्शनसाठी संपर्क साधावा

दिपाली चव्हाण (वैद्यकीय सहाय्यक) मोबाईल नंबर 8907776011

कोविड प्लाज्मासाठी संपर्क साधा

राहुल भालेराव (वैद्यकीय सहाय्यक) मोबाईल नंबर 8907776007

ठाणे रुग्णालयात पेशंटला ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी संपर्क

माऊली धुळगंडे (वैद्यकीय सहाय्यक) मो. नंबर- 8907776002
राम राऊत (वैद्यकीय सहाय्यक) मो. नंबर- 8907776004
रवींद्र ननावरे (वैद्यकीय सहाय्यक) मो. नंबर- 8907776005
सागर झाडे (वैद्यकीय सहाय्यक) मो. नंबर- 8907776006
राहुल भालेराव (वैद्यकीय सहाय्यक) मो. नंबर- 8907776007
अरविंद मांडवकर (वैद्यकीय सहाय्यक) मो. नंबर- 8907776010
ऋषिकेश देशमुख (वैद्यकीय सहाय्यक) मो. नंबर- 8907776012

संबंधित बातम्या

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस?

आनंद महिंद्राकडून खास व्हिडीओ शेअर; वीज तयार करण्याचा नवाच ‘जुगाड’

Call this number if you need an injection, bed, anything help MP Shrikant Shinde’s Foundation in thane