कर्जमाफीची लिंक ओपन केल्यावर कँडीक्रश गेम, आयुक्त निलंबित

राज्य सरकारनं कारवाई करत सहकार आयुक्त यांना जबाबदार धरत सतीश सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या लिंकमधील तांत्रिक त्रुटीही दूर करण्यात आल्या (candy crush message link on farmer mobile) आहेत.

candy crush message link, कर्जमाफीची लिंक ओपन केल्यावर कँडीक्रश गेम, आयुक्त निलंबित

मुंबई : राज्य सरकारने महत्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कँडी क्रँश गेम ओपन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी होत होत्या. त्यासंदर्भात राज्य सरकारनं कारवाई करत सहकार आयुक्त यांना जबाबदार धरत सतीश सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या लिंकमधील तांत्रिक त्रुटीही दूर करण्यात आल्या (candy crush message link on farmer mobile) आहेत.

महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी किसान पोर्टलवरुन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवले (candy crush message link on farmer mobile) होते. यात लिंकही देण्यात आली होती. मात्र ती लिंक ओपन केल्यानंतर त्यावर कँडीक्रशसह अन्य गेमच्या वेबसाईट ओपन होत होत्या. अगोदरच कर्जमाफीची प्रतिक्षा असताना असा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला होता.

काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती देणारा एक मेसेज VZ- KISSAN या एस.एम.एस पोर्टलवरून शेतकऱ्यांना पाठवण्यात आला होता. या मॅसेजमध्ये “महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या माहितीसाठी https://bit.do/mjpsky 2019 या लिंक ला भेट द्या,” असे लिहिले (candy crush message link on farmer mobile) होते.

मात्र https://bit.do/mjpsky 2019 या लिंकवर माहितीऐवजी चक्क गेम अपलोड करण्यात आले आहेत. या योजनेची माहिती देण्यासाठी शासनाने ही साईट तयार केली आहे. यावर कुठलीही माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे ही लिंक ओपन केल्यानंतर कॅन्डी क्रश सागा, डायमन डायरीज असे गेम ओपन होत होते. शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सरकारकडून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची लिंकमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. तसेच सहकार आयुक्त यांना जबाबदार धरत सतीश सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली (candy crush message link on farmer mobile) आहे.

संबंधित बातम्या : 

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज, लिंक ओपन केल्यावर कँडीक्रश गेम

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *