उस्मानाबादेत कार्टून वॉर, दिवंगत पवनराजेंवर राष्ट्रवादीची जहरी टीका

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने कार्टून वॉर पेटले आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते कार्टूनच्या माध्यमातून एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. शिवसैनिकांनी कार्टूनमध्ये डॉ पद्मसिंह पाटील कटुंबातील घराणेशाहीची परंपरा, जिल्ह्यातील महत्वाच्या संस्था बंद पाडण्याच्या आणि पैसे खाऊ वृत्तीवर टीका केली आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ओमराजे यांच्यावर अलिबाबा आणि चाळीस चोर, धान्य घोटाळा, साखर […]

उस्मानाबादेत कार्टून वॉर, दिवंगत पवनराजेंवर राष्ट्रवादीची जहरी टीका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने कार्टून वॉर पेटले आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते कार्टूनच्या माध्यमातून एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. शिवसैनिकांनी कार्टूनमध्ये डॉ पद्मसिंह पाटील कटुंबातील घराणेशाहीची परंपरा, जिल्ह्यातील महत्वाच्या संस्था बंद पाडण्याच्या आणि पैसे खाऊ वृत्तीवर टीका केली आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ओमराजे यांच्यावर अलिबाबा आणि चाळीस चोर, धान्य घोटाळा, साखर चोर, दूधवाला ते भंगारचोर अशी टीका केली आहे. दिवंगत पवनराजे यांच्यावर राष्ट्रवादीने कार्टूनमधून हल्लाबोल करत सर्व घोटाळ्याचे खापर त्यांच्यावर फोडले आहे.

शिवसेनेने पोस्ट केलेल्या कार्टूनमध्ये, डॉ पद्मसिंह पाटील परिवार सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ देत नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद, जिल्हा परिषद उपाध्यक्षपद, आमदारकी, खासदारकीसह जिल्हा बँकेतील महत्वाची पदे पाटील कुटुंबातील सदस्यांना असून, ‘कार्यकर्त्यांनो उचला सतरंज्या, लागा आमच्या घराण्यासाठी कामाला’ अशी टिप्पणी केली आहे.  तर दुसऱ्या एका कार्टूनमध्ये साखर कारखाना, तेरणा ट्रस्ट, जिल्हा बँक,  दूध संघ अशा संस्था विक्रीस काढल्याचे दाखवण्यात आले आहे. याविरोधात कोणी आवाज उठविल्यास त्याला ‘बंदुकी’चा धाक असे दाखविले आहे.

राष्ट्रवादीने पोस्ट केलेल्या कार्टूनमध्ये ओम राजे यांना अलिबाबा आणि चाळीस चोरच्या टोळी रुपात भंगारचोर असे संबोधिले आहे, तर दुसऱ्या एका कार्टूनमध्ये आई भंगारवाला आलाय , कारखाना फुकून, जिल्हा विकून – तरी बी हाय म्या राजकारणात टिकून अशा स्वरूपाची टीका ओम राजेंवर करण्यात आली आहे .

राष्ट्रवादीने तेरणा कारखाना, जिल्हा बँकसह इतर संस्थांच्या अस्ताला दिवंगत पवनराजे निंबाळकर सर्वस्वी कारणीभूत ठरवीत, पवनराजे यांचा दूधवाला ते भंगारवाला प्रवास, शेतकरी आणि सभासदांचा पैसा घातला खिशात, आणि राहून गेला उस्मानाबादचा विकास. असा गंभीर आरोप केला आहे.

डॉ पदमसिंह पाटील यांच्या हुकूमाने पवनराजे कारभार पाहत होते, मात्र अविकासाचे खापर दिवंगत पवनराजे यांच्यावर फोडून डॉ पाटील परिवार आपण घोटाळ्यापासून अलिप्त असल्याचे दाखवित आहेत. डॉ पद्मसिंह पाटील पवनराजे हत्याकांडात आरोपी आहेत. मयत पवनराजे यांच्यावरील कार्टून राष्ट्रवादीच्या चांगलेच अंगलट आले असून, राजकीय पातळी घसरल्याची सोशल मीडियावर कडाडून टीका होत आहे.

तर कै. पवनराजे यांच्यावरील कार्टून नंतर शिवसैनिकांनी आमदार राणा यांच्यावर कविता रचली आहे . मी पाटलाचा लेक काहीही करीन.. जिल्हा बँक बुडवीन, नाही तर दूध संघ विकीन, जिल्हा बँक बुडवीन, नाही तर दूध संघ विकीन .. डीसीसीच्या ठेवीदारांचे पैसे बुडवीन , बॉम्बे रेयॉन बंद पाडीन , नाय तर तेरणा बंद पाडीन ..खासदारकी लढवीन नायतर आमदारकी लढवीन मी पाटलाचा लेक एकुलता एक .. ही कविता चांगलीच चर्चाचा विषय ठरत आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.