वाढीव वीजबिलाविरोधातील मोर्चा मसनेला पडला महागात, 125 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

या मोर्चा प्रकरणी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 125 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:27 PM, 27 Nov 2020
वाढीव वीजबिलाविरोधातील मोर्चा मसनेला पडला महागात, 125 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रत्नागिरीत : वाढीव वीजबिलाच्या विरोधात काढलेला मोर्चा मनसेला चांगलाच महागात पडला आहे. कारण, रत्नागिरीत जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश लागू असतानाही मनसेनं गुरुवारी वाढीव वीजबिलाविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चा प्रकरणी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 125 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, कलम 143, 149, 188, 269, 270 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. (case filed against 125 to 150 mns workers for Mass protests against increased electricity bill in ratnagiri)

शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबिलं माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश लागू असतानाही हा मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण आणि इतर कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला. इतकंच नाही तर जमलेल्या कायकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करून बेकायदेशीर जमाव करत मोर्चा काढला.

एकीकडे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे सामाजिक अंतर न ठेवता आंदोलन केलं. यामुळे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी 16 नोव्हेंबर 2020 रोजीपासून फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जारी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष जिंतेद्र चव्हाण, राज्य उपाध्यक्ष सुनिल साळवी, उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, शहर प्रमुश सतिश राणे, राजु पाचकुडे, विद्यार्थी सेना प्रमुख गुरुप्रसाद चव्हाण, शहर प्रमुख अमोल श्रीनाथ, युवक कार्यकारणीचे चैतन्य शेंडे यांच्यासह 100 ते 125 इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case filed against 125 to 150 mns workers for Mass protests against increased electricity bill in ratnagiri)

दरम्यान, वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आक्रमक पावित्रा घेत आंदोलनाचा पावित्रा दिला. भरमसाठ वीजबिल प्रकरणी मनसेने गुरुवारी राज्यभर ‘झटका मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती.

इतर बातम्या –

मनसे मोर्चासाठी मुंबईतील ‘हे’ मार्ग वाहतुकीस बंद

PHOTO | वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा राज्यभर ‘झटका मोर्चा’

(case filed against 125 to 150 mns workers for Mass protests against increased electricity bill in ratnagiri)