चिथावणीखोर वक्तव्य भोवलं, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर औरंगाबादमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांनी चिथावणीखोर व्हिडीओ प्रसारित करत एका पक्षाची कार्यालये उद्ध्वस्त करण्याचे आवाहन केले होते. याची दखल घेत शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यावर शहरातील शांतता भंग करण्याचा आरोप आहे. त्यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून एका …

चिथावणीखोर वक्तव्य भोवलं, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर औरंगाबादमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांनी चिथावणीखोर व्हिडीओ प्रसारित करत एका पक्षाची कार्यालये उद्ध्वस्त करण्याचे आवाहन केले होते. याची दखल घेत शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्यावर शहरातील शांतता भंग करण्याचा आरोप आहे. त्यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून एका पक्षाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच आपल्या समर्थकांना या पक्षाची कार्यालये उद्ध्वस्त करण्यासाठी चिथावणी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ फेसबुकवरुन हटवला आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलाने महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर हर्षवर्धन जाधव यांनी माफीची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित मुलाने माफीही मागितली. मात्र, या माफीत स्पष्ट उल्लेख नसल्याचा आक्षेप घेत जाधव यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी देणारे आवाहन केले होते.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

हर्षवर्धन जाधव शिवसेनेचे माजी आमदार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. हर्षवर्धन जाधव यावेळी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. जाधव यांच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्यांना 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षाही झालेली आहे. ते प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *